11 April 2021 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेची बाजी

Aurangabad District Central Co-operative Bank, Nitin patil, Shivsena

औरंगाबाद, ५ एप्रिल: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला होता. पण ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. उपाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. मतदान घ्यावे लागले. यात अर्जून गाडे यांचा ६ मतांनी दणदणीत विजय झाला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला सोमवारी सकाळी ११ वाजता सुरूवात झाली होती. अध्यक्ष पदासाठी नितीन पाटील व मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता. यामुळे राजकीय नाट्य चांगले तापले होते. दीडतास हा गोंधळ सुरू होता. भुमरे ऐकत नसल्याने मंत्री सत्तार यांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज मागवला होता. पण भुमरे यांनी स्वत अर्ज मागे घेतला. त्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते.

त्यापैकी दिनेश परदेशी आप्पासाहेब पाटील यांनी माघार घेतली तर जगन्नाथ काळे, कृष्णा पाटील डोणगावकर आणि अर्जुन गाढे निवडणूक रिंगणात उतरले होते. डोणगावकर यांनी पॅनल सोडून शिवबंधन बांधले. यामुळे काळे यांचे संचालक नाराज झाले होते. तर शिवबंधन बांधून ही त्यांनी बंडखोरी करून अर्ज भरला व म्हणून सत्तार यांचा रोष ओढवून घेतला. यामुळे दुपारी एक वाजे दरम्यान झालेल्या निवडणुकीत डोणगावकर पराभूत झाले. गाडे यांचा विजय झाला.

बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जावे यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण काही गद्दारांमुळे उपाध्यक्ष पदासाठी दुर्दैवाने निवडणूक झाली. यात त्यांचा पराभव झाला आहे. आगामी निवडणुकीत याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा मंत्री अब्दूल सत्तार यांनी दिला आहे. तसेच हरिभाऊ बागडे, सतीश चव्हाण, डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड यांनी सहकार्य केले. यामुळे विजय सुनिश्चित झाल्याचे सत्तार म्हणाले.

 

News English Summary: Nitin Patil has been elected unopposed as the Chairman of Aurangabad District Central Co-operative Bank. Cabinet Minister Sandipan Bhumare had shocked everyone by filing an application. But at the time, he withdrew his application, paving the way for Patil. The race for the vice presidency was on. Had to vote. In this, Arjun Gade won by 6 votes.

News English Title: Shivsena wins big at Aurangabad district central co operative bank elections news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1074)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x