आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व बनण्यासाठी मोदींनी ओबामांना कॉपी करण्यास सुरुवात केली होती?
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जंगल सफारीवर जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना डिस्कव्हरीवरच्या मॅन व्हेर्सेस वाइल्ड या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. मोदी जंगल सफारीवर येणार असल्याची माहिती बेअर ग्रिल्सनेच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बेअरच्या घोषणेनंतर समाज माध्यमांवर त्याच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery, तर Bear Grylls हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत.
१४ फेब्रुवारी पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले होते. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वच बाजूंनी सरकारवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान, त्याच दिवशी पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील जिमकॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात तब्बल३ तास शूटिंगमध्ये व्यस्त होते आणि ते शूट डिस्कव्हरी वाहिनीकडून कडून सुरु होते ज्याची चर्चा सध्या रंगली आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून नरेंद्र मोदींच्या त्या शुटिंगचे पुरावे देखील दिले होते. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याची माहिती मिळल्यानंतरही ३ तास प्राइम टाइम मिनिस्टर शूटिंगमध्ये व्यस्त होते असे हिंदीमध्ये ट्वीट केले आहे. ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला वेदना होत होत्या, शहीद जवानांच्या घरातील स्थितीही वेगळी नव्हती. असे असताना मोदी मात्र पाण्यामध्ये हसत शूटींग करीत होते, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.
पुलवामा में 40 जवानों की शहादत की खबर के तीन घंटे बाद भी ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ फिल्म शूटिंग करते रहे।
देश के दिल व शहीदों के घरों में दर्द का दरिया उमड़ा था और वे हँसते हुए दरिया में फोटोशूट पर थे।#PhotoShootSarkar pic.twitter.com/OMY7GezsZN
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 22, 2019
वास्तविक या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जरी १२ ऑगस्ट रोजी होणार असले तरी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग त्याच दिवशी करण्यात आले होते, ज्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी भारतात सीआरपीएफ जवानांवर पुलवामा येथे भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आल्याने देशातील मोठे राजकीय नेते अशी प्रतिमा झालेल्या मोदींना, जागतिक नेते बनण्याची घाई झाल्याने त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कॉपी करण्यास सुरुवात केली होती. त्याचंच प्रत्यय म्हणजे त्यावेळी बराक ओबामांनी देखील बेअर ग्रिल्स’सोबत डिस्कव्हरी वाहिनीसाठी जंगल सफारी केली होती आणि नेमका तोच प्रकार कॉपीपेस्ट करण्याचा प्रकार केला होता. एकूणच मोदी स्वतःच असं नवीन काहीच करत नाहीत, मात्र त्यांच्या निरीक्षणातून ते इतरांचे प्रसिद्धीचे फॉर्मुले कॉपी करतात हे अनेकदा सिद्ध झालं आहे.
त्यामुळे जगभरातील घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणाऱ्या बेअर ग्रिल्स याच्या जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या डिस्कव्हरी चॅनेलवरील मालिकेत चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकणार आहेत. बेअरसोबत हाती लाकडाचे शस्त्र हाती घेतलेले, रानवाटा तुडवणारे, नदीचा प्रवाह कापणाऱ्या पंतप्रधानांचा व्हिडीओ सोमवारी प्रसिद्ध झाला आणि पंतप्रधानांचे हे नवे रूप पाहून सर्वच चकित झाले.
जगभरातील भ्रमंतीकार, नवनव्या वाटा धुंडाळणाऱ्या लोकांसोबतच दिवाणखान्यात बसून ‘डिस्कव्हरी’समोर ठाण मांडून बसणाऱ्यांसाठीही बेअरचा ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ हा शो प्रसिद्ध आहे. जगण्यासाठी काहीही खाणारा आणि निबीड अरण्यात वाट चुकल्यास सुखरूप परतीच्या प्रवासासाठी मोलाच्या युक्त्या सांगणारा बेअर चक्क पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात फिरला आहे. पंतप्रधानांना जंगलातील अनोखी व सर्वसाधारण दर्शकांसाठी अप्रसिद्ध माहिती देताना त्याचे दर्शन घडेल.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअरसोबत निसर्गातील विविधता आणि निसर्ग संवर्धनावरील उपायांवर चर्चा करताना दिसणार आहेत. बेअर ग्रिल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींसोबतची जंगलातील एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध केली. ‘१८० देशांतील नागरिक भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरूप होतील’, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांच रूप निराळेच आहे. यात मोदी यांनी स्पोर्ट्स ड्रेस परिधान केला आहे. त्याचबरोबर ते बेअरसोबत एका छोट्या नावेतून प्रवास करतानाही दिसतील. हा कार्यक्रम १२ ऑगस्टला प्रक्षेपित होणार आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा