12 December 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

काँग्रेसला उद्याच बहुमत सिद्ध कराव लागणार.....अन्यथा - सविस्तर वृत्त

News Latest Updates, MP Governor Lalji Tandon, CM Kamal Nath

भोपाळ, १६ मार्च : मध्य प्रदेशात राजकीय नाट्य अद्याप संपलेलं नाही. त्याचा शेवटचा अंक उद्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्याच्या उद्या म्हणजे १७ मार्चलाच फ्लोअर टेस्ट घ्या, असं सांगितलं आहे. १७ मार्चला फ्लोअर टेस्ट घेतली गेली नाही, तर काँग्रेसकडे बहुमत नाही, असं मानलं जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

तत्पूर्वी भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपालांची भेट घेऊन १०६ आमदारांची ओळख परेड करवून घेतली. कमलनाथ सरकार अल्पमतात असल्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, असे चौहान यांनी सांगितले. मध्य प्रदेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल, असे सांगितले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी आपल्याला याविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या ६ आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. एकूण २३० सदस्य संख्या असून यातील २ जागा रिक्त आहे. काँग्रेसकडे १०८, भाजपाकडे १०७, बसपा २, सपा १ आणि अपक्ष ४ आमदार आहेत. सध्या विधानसभेचं एकूण संख्याबळ २२२ आहे. बहुमतासाठी ११२ आमदारांची गरज भासणार आहे. काँग्रेसला ४ आमदारांची गरज आहे. सपा, बसपा आणि अपक्ष मिळून ७ आमदारांचा पाठिंबा काँग्रेसला मिळाला तर सरकार बहुमत सिद्ध करु शकते. अशा परिस्थितीत काँग्रेसकडे ११५ आमदारांचे पाठबळ राहील. मात्र १६ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यास काँग्रेसचं संख्याबळ ९२ इतकं होईल.

 

News English Summery: Political drama in Madhya Pradesh is not over yet. His final score is expected tomorrow. In a letter to Chief Minister Kamal Nath, Governor Lalji Tandon has said that he should take the floor test tomorrow, March 17 only. If the floor test is not taken on March 17, then the Congress has given clear instructions that the Congress will not have a majority. Earlier, BJP leader Shivraj Singh Chouhan met the governor and paraded the identity of 106 MLAs. Chauhan said that the Kamal Nath government is in a minority and it should give BJP an opportunity to establish a government. The budget session of the Madhya Pradesh Legislature began today. It was said at the time of the Governor’s address that the government would make a credible resolution. However, Assembly Speaker NP Prajapati said that he did not know anything about it. Also, in the wake of Corona, the session was adjourned until March 26. After this, the BJP had run in the Supreme Court.

 

News English Title: Story Madhya Pradesh governor Lalji Tandon writes to Chief Minister Kamal Nath conduct the floor test on 17 March 2020 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x