जेडीयूच्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नाही

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचारात लवकरच रंग भरायला सुरूवात होणार असून, त्याआधी जागा वाटपांवरून मनधरणी नाट्य घडताना दिसत आहे. सध्या सत्तेत असलेल्या एनडीएत नितीश कुमार भाजपावर नाराज असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे सोमवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला ते हजर नव्हते. मात्र, नाराज झालेल्या नितीश कुमार यांची भाजपानं मोठं वचन देत मनधरणी केली. त्यानंतर नितीश कुमार हजर झाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागावाटपात संयुक्त जनता दलाने आधीच्या तुलनेत कमी जागांवर तडजोड केली. याआधीच्या निवडणुकांमध्ये आघाडीत धाकटय़ा भावाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने या वेळी १२१ जागा पदरात पाडून घेतल्या असून, संयुक्त जनता दलाच्या वाटय़ाला १२२ जागा आल्या आहेत. मात्र, हे जागावाटप जाहीर करण्यापूर्वी जदयू व भाजपात नाराजीनाट्य घडलं.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते. दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक असलेले गुप्तेश्वर पांडे पोलीस सेवेतून अचानक स्वेच्छानिवृ्त्ती घेऊन राजकारणात आले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत दणक्यात जेडीयूमध्ये प्रवेश केल्याने त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार हे नक्की मानले जात होते. मात्र आता ही शक्यता मावळताना दिसत आहे. कारण जेडीयूने पांडे यांना तिकीट दिलेले नाही.
जेडीयूने तिकीट न दिल्याने नोकरीही गेली आणि विधानसभेची उमेदवारीही गेली, अशी अवस्था झालेल्या गुप्तेश्वर पांडेंना आता भाजपाचा आधार मिळू शकतो. बक्सर जिल्ह्यामधील ब्रह्मपूर आणि बक्सर हे मतदारसंघ भाजपाकडे असून, तिथून भाजपाने आपले उमेदवार घोषित केलेले नाही. त्यामुळे आता गुप्तेश्वर पांडे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे.
News English Summary: The Bihar Assembly election begins from October 28, when 71 seats will go to the polls including those in the Buxar district from where Gupteshwar Pandey, as speculation went, hoped to contest. Buxar is Gupteshwar Pandey’s hometown and it has gone to the BJP in the seat-sharing deal that it struck with the JDU of Nitish Kumar. Gupteshwar Pandey took voluntary retirement from service five months ahead of his scheduled retirement in February next year. Pandey, who retired as Bihar’s DGP, did not waste time in joining the JDU in the presence of Nitish Kumar, the party president and the Bihar chief minister.
News English Title: Bihar Assembly Election 2020 JDU not give ticket now what will Gupteswar Pandey do Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
TATA Motors Share Price | 861 रुपये टार्गेट प्राईस, नुवामा ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग, फायदा घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकमध्ये तेजी, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: IDEA
-
BEL Share Price | ऑर्डरबुक मजबूत असलेल्या या कंपनीचा शेअर खरेदी करा, संयमातून मोठा परतावा मिळेल - NSE: BEL
-
Wipro Share Price | विप्रो IT शेअर्समध्ये 4.64 टक्क्यांची घसरण, पण पुढे अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
Jio Finance Share Price | हीच खरेदीची संधी, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN