23 September 2021 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Health First | लिंबू कापताना आडवाच का कापायचा? | जाणून घ्या कारण

Why to cut a lemon horizontally

मुंबई, ०७ सप्टेंबर | ‘लिंबू’ हे एक असे फळ आहे, ज्याच्याशी आपण सारेच परिचित आहोत. अगदी लिंबू सरबत पासून ते विविध अन्न पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जाणारा लिंबू आकाराने लहान असला तरीही त्याचे अनेको गुणधर्म आरोग्यदायी असतात. लिंबू आपल्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी तसेच तहान शमविण्यासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय थकवा दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठीदेखील लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. देशात लिंबू उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. दरम्यान संपूर्ण देशात लिंबाचे सुमारे १८ लाख मे. टन इतके उत्पादन घेतले येते. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे १.४० लाख मे. टन इतक्या लिंबाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या देशामध्ये इतर भाज्यांप्रमाणेच लिंबालाही एक विशेष महत्त्व आहे. इतकेच काय तर लिंबाविषयी विविध समज गैरसमज देखील आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

लिंबू कापताना आडवाच का कापायचा?, जाणून घ्या कारण – Why to cut a lemon horizontally know the reason :

आपल्याकडे कोणत्याही स्वयंपाकघरात लिंबू आढळतोच. कारण उपमा असो नाहीतर पुलाव लिंबाचा रस हवाच. पण काय आहे, स्वयंपाक घर एक असे ठिकाण आहे जिथे अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे व्यवधान पाळावे लागते. जसे कि, कांदा चिरण्यापासून ते एखादा पदार्थ बनविण्यापर्यंत. साधारणपणे या यादीत लिंबू चिरणे ही कृतीही समाविष्ट असते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल कि, आपल्या घरातील मोठे जाणकार लोक नेहमी स्वयंपाक करणाऱ्या मुलामुलींना लिंबू आडवे कापण्याचा सल्ला देतात.

आता यामागे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. पण मुळात याचे कारण असे कि, लिंबू उभे कापल्यास त्यातून रस बाहेर येत नाही. म्हणजेच लिंबू त्याच्या देठाकडून उभा न कापता तो आडवा धरून मध्यभागी कापणे अधिक फायदेशीर असते. या क्रियेमागे शास्त्रीय कारण आहे हे अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे लिंबू कंपन्यांच्या क्रियेबाबत अनेक विविध तर्क लावले जातात.

वास्तविक लिंबाच्या आतील भाग छोट्या छोट्या १०-१२ पाकळ्यांचा बनलेला असतो. जसे कि संत्र, मोसंबीला पाकळ्या असतात अगदी तसेच लिंबातही पाकळ्या असतात. अशा प्रत्येक पाकळ्यात लिबांचा गर रसासहित साठलेला असतो. त्यामुळे जर लिंबू उभे चिरले तर सुरी प्रत्येक खणाला भेदून प्रत्येक पाकळीच्या आरपार जात नाही. त्यामुळे अशा लिंबाच्या तुकड्याचा रस पिळल्यावर तो सहज बाहेर पडत नाही. हेच जर लिंबू आडवे कापले तर सुरी प्रत्येक पाकळीला छेदून आरपार जाते आणि लिंबाचा तुकडा पिळल्यावर त्याचा रस अगदी सहजरित्या बाहेर पडतो. म्हणूनच लिंबाचा रस सहज मिळवण्यासाठी लिंबू उभे नाही तर आडवे चिरायचे असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Why to cut a lemon horizontally know the reason.

हॅशटॅग्स

#Health(753)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x