15 December 2024 7:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट

Highlights:

  • Eknath Shinde Camp in Danger Zone
  • शिंदे यांच्या शिवसेनेला गटाला केवळ ५.५ टक्के मते मिळतील
  • महाविकास आघाडीला सर्वाधिक ४७.७ टक्के मते मिळतील
  • सर्वेक्षणात मनसेचा आकडा ‘शिल्लक’ नाही
  • एकनाथ शिंदे आणि शिंदे गट धोक्यात
Eknath Shinde Camp

Eknath Shinde Camp in Danger Zone | महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पाश्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने एनडीए सरकारविषयी सर्वसामान्यांच्या भावनांवर एक सर्वेक्षण केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रातील मतदारांचे काय मत आहे, हेही या सर्वेक्षणात जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २०२४ च्या निवडणुकीत मतदान करताना कोणत्या पक्षाची निवड कराल, असा प्रश्नही ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात विचारण्यात आला आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेला गटाला केवळ ५.५ टक्के मते मिळतील

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता सर्वेक्षणाच्या निकालातून दिसून येत आहे, तर सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. आज निवडणुका झाल्या तर भाजप राज्यात नंबर वन पक्ष ठरू शकतो आणि त्यांना एकूण ३३.८ टक्के मते मिळू शकतात, तर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेला केवळ ५.५ टक्के मते मिळू शकतात. अशा प्रकारे संपूर्ण एनडीएला केवळ ३९.३ टक्के मते मिळू शकतील असं सर्वेक्षणा म्हटलं आहे.

महाविकास आघाडीला सर्वाधिक ४७.७ टक्के मते मिळतील

महाविकास आघाडीला सर्वाधिक ४७.७ टक्के मते मिळू शकतात, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. या सर्वेक्षणात काँग्रेसला सर्वाधिक १९.९ टक्के, राष्ट्रवादीला १५.३ टक्के, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १२.५ टक्के मते मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात नोंदविण्यात आली आहे. याशिवाय बहुजन वंचित आघाडीला २.९ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला ०.७ टक्के, ओवेसी यांच्या पक्षाला एआयएमआयएमला ०.६ टक्के, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला ०.५ टक्के आणि इतरांना १.७ टक्के मिळण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणात मनसेचा आकडा ‘शिल्लक’ नाही

विशेष म्हणजे यामध्ये केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला देखील ०.५ टक्के मतं दिसत असली तरी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात भूमिका, वक्तव्य आणि राजकीय हालचाली करणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाचं नावं मतदारांच्या ओठावर सुद्धा दिसत नाही. त्यामुळे मनसेचं आगामी निवडणुकीत अस्तित्व संपुष्टात येतंय का अशी चिंता व्यक्त करणारी आकडेवारी या सर्वेक्षणात दिसत आहे असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत.

एकनाथ शिंदे आणि शिंदे गट धोक्यात

एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत अभूतपूर्व उठाव करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडले आणि मुख्यमंत्रिपदाची खुर्ची स्वीकारण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली होती. इतकंच नाही तर शिंदे गटाला शिवसेनेचा पक्ष आणि पक्ष चिन्हही मिळालं. त्यामुळे शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्याचे बोलले जात होते, पण ताज्या सर्वेक्षणामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण मतदारांना शिंदेंचा शिवसेनेला संपविण्याचा कट रुचलेला नसून ते शिंदेंना कायमची अद्दल घडवतील असे सर्वेक्षणातील आकडेवारीतून दिसून येतंय.

Sakal-Group

News Title: Eknath Shinde Camp in Danger Zone in upcoming Election check details on 30 May 2023.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde Camp(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x