4 December 2022 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

Malegaon, Ex MLA Asif Shaikh, NCP party, Minister Jayant Patil

मुंबई, २५ मार्च: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “बर्‍याच दिवसापासून आपली वाट पहात होतो. कॉंग्रेसला आम्ही याची कल्पना दिली आहे”, असे म्हणत जयंत पाटील यांनी आसिफ शेख यांचे पक्षात स्वागत केले. “कोरोना काळात मालेगावमधील सर्वांना आसिफ शेख यांनी विश्वासात घेऊन प्रवेश घेतला आहे. मालेगावमधील लोकांना शरद पवारांच्या कामावर विश्वास आहे. मालेगाव नगरपालिकेत ज्या समस्या आहेत त्याची कल्पना आम्हाला दिली आहे”, असेही जयंत पाटील म्हणाले.

पुढे आसिफ शेख यांच्या पक्षप्रवेशदरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, “आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

 

News English Summary: Former MLA of Malegaon Asif Sheikh today joined the NCP along with hundreds of his workers in the presence of NCP State President and Water Resources Minister Jayant Patil. Deputy Chief Minister Ajit Pawar and Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal were also present on the occasion.

News English Title: Malegaon Ex MLA Asif Shaikh joined NCP party in presence of minister Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x