15 December 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

VIDEO | सचिन वाझे आणि मनसुख 17 फेब्रुवारीला CST स्टेशनच्या बाहेर भेटले

Mansukh Hiren, Sachin Vaze, Mercedes scene, CCTV CSMT road

मुंबई, २५ मार्च: अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कड्या जोडणारे एक CCTV फुटेज समोर आले आहे. यामध्ये दिसतेय की, 17 फेब्रुवारीला वाझे आणि मनसुख यांची भेट झाली होती. CCTV फुटेज CST रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे आहे. आता तपास यंत्रणांनुसार, या भेटीदरम्यानच मनसुखने स्कॉर्पियोची चावी वाझेला सोपवली होती.

17 फेब्रुवारीलाच मनसुखने स्कॉर्पियो चोरी करण्यात तक्रार दिली होती. ही तीच स्कॉर्पियो होती. ज्यामध्ये स्फोटके ठेवून मुकेश अबानींचे घर अँटिलिया समोर पार्क करण्यात आली होती.

सध्या जे CCTV फुटेज समोर आले आहे त्यामध्ये दिसतेय की, एक पांढऱ्या रंकाची कार CST रेल्वे स्टेशनबाहेर थांबते. कारमधून मनसुख हिरेन उतरतो. तर दुसऱ्या फुटेजमध्ये सचिन वाझेची निळ्या रंगाची ऑडी दिसत आहे. जी ट्रॅफिक सिग्नलवर थांबते आणि ज्यामध्ये मनसुख हिरेन बसतो.

दरम्यान, आता तपासात आता एका संशयित महिलेचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. ही संशयित महिला हॉटेल ट्रायडंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत आहेत. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याची मशीन असल्याचं निदर्शनास आलं आहे. पण या महिलेने मास्क घातल्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण जात आहे.

 

News English Summary: A CCTV footage linking the Antilia case and the death of Mansukh Hiren has surfaced. It appears that Vaze and Mansukh met on February 17. CCTV footage is from outside the CST railway station. Now, according to investigators, Mansukh handed over the Scorpio key to Sachin Vaze during the visit.

News English Title: Mansukh Hiren was seen driving through confiscated Mercedes scene capture in CCTV CSMT road news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x