11 July 2020 12:42 PM
अँप डाउनलोड

ऑनलाईन बँकिंग विश्वात आता 'व्हॉट्सअँप पे' सुद्धा येणार.

whatsapp, Online Payment, Digital Payment System, RBI Guidelines, PhonePe, PayTM, Rupay, Google Online Payment

मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाला सर्वच गोष्टी अगदी बसल्या जागी करायच्या असतात. त्यातच आता बँकिंग सेवा सुद्धा मागे राहिलेली नाही. ऑनलाईन बँकिंगमूळे हल्ली पैशाचा व्यवहार अगदी सहज सोपा झाला आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे पोहोचवण्यासाठी त्या व्यक्तीला भेटायला हवेच असे नाही. हे पैसे पोहोचवण्यासाठी आपल्या मोबाईल वर विविध अँप उपलब्ध आहेत. या अँपद्वारे आपण हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी व्यवहार करू शकतो.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्यातच व्हॉट्सअँप हे जगातील सर्वात लोकप्रिय असे इन्स्टंट मेसेजिंग अँप आहे. बाकी सगळ्या अँप च्या तुलनेत जगात व्हॉट्सअँप वापरणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात व्हॉट्सअँप’चे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्तित होते. या कार्यक्रमात व्हॉट्सअँप च्या कामगिरीबद्दल चर्चा करण्यात आली. याशिवाय व्हॉट्सअँपच्या व्यवसाय कामगिरीबद्दल सांगण्यात आले. भारतात लहान लहान व्यवसाय व्हॉट्सअँपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

कित्येक लोक आपल्या व्यवसायाचा प्रचार व्हॉट्सअँपद्वारे करत आहेत. याच सगळ्या गोष्टी व व्हॉट्सअँपचा लोकांमधील वाढता वापर लक्षात घेऊन व्हॉट्सअँप चे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट यांनी आता व्हॉट्सअँप पेमेंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षाअखेरीस व्हॉट्सअँप पे लोकांच्या भेटीला येणार असल्याचा त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता व्यवहार करणे आणखी सोपे व सोईचे जाणार आहे. हे अँप बाकी अँपच्या तुलनेत सुरक्षित देखील असण्याचा सांगितलं जातंय.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#gadgets(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x