13 May 2021 3:00 AM
अँप डाउनलोड

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार'ला एका महिलेने पाठविले अश्लील मेसेज

gayatri Datar, tula pahate re serial, Marathi Serial Tula Pahate Re, vulgar messages

मुंबई : झी मराठी वाहिनी वरील तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांच्या अगदीच पसंतीस पडली. त्याचप्रमाणे मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार हिने थोड्याच कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच ह्या मालिकेचा शेवट झाला असून विक्रांत आणि ईशाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच भावली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ह्या प्रेमकहाणी मधून बाहेर पडत असतानाच गायत्रीला व तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका महिलेने गायत्रीला फेसबुक’वर अत्यंत अश्लील मेसेज पाठविले आहेत. ह्या मेसेजचा स्क्रीनशॉट आपल्या इन्सटाग्राम स्टोरीवर पोस्ट करताना हे असे मेसेज केलेच पाहिजेत का असा प्रश्न विचारला आहे. त्याचसोबत त्या महिलेविरुद्ध रिपोर्ट करण्याचे आवाहनही तिने आपल्या चाहत्यांना केले आहे.

पुढे तिने म्हटलं की, मी हा मॅसेज प्रमोट करत नाही किंवा मला कुणाकडून मॅसेज यावा असाही हा मॅसेज शेअर करण्याचा अर्थ नाही. इथे त्या व्यक्तीचा फेसबुक अकाउंट आहे. या व्यक्ती विरोधात रिपोर्ट करा. आपली पावर दाखऊयात.

हॅशटॅग्स

#filmy(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x