12 August 2020 2:22 PM
अँप डाउनलोड

भाजपकडे बहुमत असेल, तर खुशाल सत्ता स्थापन करावी: संजय राऊत

MP Sanjay Raut, Shivsena, BJP Maharashtra

मुंबई: ‘सामना’च्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केल्यानंतर गुरुवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ‘आम्ही दिलेला शब्द आणि नीतिधर्म पाळतो, भारतीय जनता पक्षानेही तो पाळावा’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना अजून देखील मुख्यमंत्रीपदासह इतर सत्तापदांमध्ये समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘जर भारतीय जनता पक्ष किंवा इतर कुणाकडेही बहुमत असेल, तर त्यांनी खुशाल सत्ता स्थापन करावी’, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपणच मुख्यमंत्री होणार अशी भूमिका आक्रमकपणे मांडल्यानंतर शिवसेना मवाळ भूमिका घेणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, संजय राऊतांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

एवढंच नाही तर आम्ही नरमाईची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. युती असल्याने चर्चा होऊ शकते असं शिवसेनेने म्हटलं आहे त्यामुळे यात नरमाईचं काहीही धोरण नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. अमित शाह यांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद पार पडली होती त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समसमान फॉर्म्युला असेल हे म्हटलं होतं. आमचीही तेवढी एकच मागणी आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंं. शिवसेना आमच्यासोबत येणार नसेल तर आम्हाला पर्याय खुले आहेत असं जर भारतीय जनता पक्ष म्हणू शकते तर तो हक्क आम्हालाही आहे असंही संजय राऊत म्हणाले.

यावेळी राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. विनाशकाले विपरीत बुद्धी हे विधान त्यांनी स्वतःबद्दल केलं, असा टोला त्यांनी लगावला. मुनगंटीवार यांनी स्वतःला आधी मंत्रिपद मिळतं की नाही ते पाहावं, अशी टिप्पणीही त्यांनी केली. पर्याय सर्वांसाठी खुले असतात, पण आम्हाला ते पाप करायचे नाहीत, असंही त्यांनी सांगितले.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून चढाओढ सुरूच आहे. एकीकडे शिवसेनेने थेट मुख्यमंत्रिपदावरच दावा ठोकला आहे. तर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापनेचा मुहुर्त लांबत चालला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x