5 August 2021 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा
x

अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी

Covid 19 virus pills

वॉशिंग्टन, १८ जून | अमेरिकन सरकारने कोरोनावर लस तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांना 18 अब्ज डॉलर्स दिले होते. आता अमेरिकाजवळ 5 लसी असून त्यांना रेकॉर्ड टाईममध्ये तयार करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बायडेन सरकार आता कोविड 19 च्या टॅबेलट बनवण्याची तयारी करत असून यासाठी 3 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या गोळ्या सुरुवातीलाच कोरोनाच्या विषाणूला नष्ट करणार आहे. यामुळे लाखो लोकांचे जीव वाचणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या माहितीनुसार, अमेरिकन आरोग्य व मानव सेवा विभागाने कोविड – 19 पिल्स प्रोग्राम जाहीर केला आहे. दरम्यान, यासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला असून ट्रायल्स लवकरात लवकर घेण्याचे काम सुरु केले आहे. जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षाच्या अखेरीस काही गोळ्या बाजारात येतील असा दावा डीएचएचएसने केला आहे. या अभियानात केवळ कोरोनावरच नव्हे तर भविष्यातील संभाव्य रोगांवरील औषधांसाठी काम केले जाणार आहे. त्यासाठी अँटी व्हायरल प्रोग्राम फॉर पेन्डॅमिक चालवला जात आहे.

संबंधित अहवालानुसार, इन्फ्लूएन्झा, एचआयव्ही आणि हिपॅटायटीस सारख्या जीवघेण्या आजारांवरील औषधे किंवा गोळ‌्या तयार केल्या जातील. यावर आधीपासूनच संशोधन सुरु होते. परंतु, कोरोना येण्यापूर्वी इतर रोगांच्या गोळ्या तयार करण्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे हे काम आता मिशन मोडवर सुरु करण्यात आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Covid 19 virus pills America to spent more than 3 billion to developing pills to fight covid 19 virus news updates.

हॅशटॅग्स

#America(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x