28 June 2022 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे? नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी
x

Fast Food Wrap | तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाता? | मग हे अवश्य वाचा

Fast food, wrap

Fast Food Wrap | अनेकांना वर्तमानपत्रातून काही पदार्थ पेपरमध्ये बांधून आणलेलं पाहायला मिळतं. पण अशाप्रकारे वर्तमानपत्रात गुंडाळून आणलेले पदार्थ खाणं आरोग्यास हानीकारक ठरु शकतं. विशेषज्ञांनी अशाप्रकारच्या खाण्यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकत असल्याचं सांगितलं आहे.

वृत्तपत्र छापताना हानीकारक रसायन :
वृत्तपत्र छापताना ज्या प्रकारच्या शाईचा उपयोग केला जातो, त्यात हानीकारक रसायन असतात. हे रसायन इतके हानीकारक असतात की, यामुळे कॅन्सरसारखा आजारही उद्भवू शकतात. वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते. आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते. FSSAI ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने देखील अनेकदा पेपरमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं सांगितलं आहे.

फुफ्फुसांचा कर्करोगही होण्याचा धोका :
पेपरवर असलेली शाई, अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात जाते म्हणजे एकप्रकारे केमिकलच आपल्या पोटात जातं. यामुळे पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते. या केमिकलचा हार्मोन्सवरही परिणाम होऊ शकतो. पेपरमध्ये ठेवलेलं तेलकट पदार्थ खाणं तर अधिक धोकादायक आहे. खाद्यपदार्थाला चिटकून जे हानिकारक केमिकल पोटात जातात, त्यामुळे मुत्राशय, फुफ्फुसांचा कर्करोगही होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे, वर्तमानपत्रात गुंडाळलेले कोणतेही खाद्यपदार्थ, पेपरमधील अतिशय तेलकट पदार्थ खाणं शक्यतो टाळा.

योग्य पावले उचलण्याचे निर्देश :
सर्व राज्यांमधील अन्नसुरक्षा आयुक्तांनी वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ बांधून दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी आणि हा वापर थांबविण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निर्देश ‘एफएसएसएआय’ने दिले आहेत.

News Title: Fast Food Wrap in newspaper is harmful for health check details 18 June 2022.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x