13 December 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत पळ काढला, तर ढाल-तलवार चिन्हावर निवडणूकच न लढणाऱ्या शिंदेंचा हास्यास्पद राजकीय दावा

CM Eknath Shinde

Shinde Camp | शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व येथील निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. वास्तविक या चिन्हावर त्यांनी अजून एकही निवडणूक लढवलेली नाही. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात वाद असताना ठाकरे मशाल चिन्हासह थेट अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवून ती मोठ्या मतांनी निवडून देखील आल्याचं पाहायला मिळालं होतं.

ठाकरेंनी मशाल चिन्हं वापरून निवडणूक जिंकली :
शिवसेनेचे माजी आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांना २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत एकूण 62,247 मतं पडली होती. तर ऋतुजा लटके यांना 66,530 मतं पडली होती, म्हणजे सेनेची मतं अधिक वाढली होती. पोटनिवडणुकीत एकुण मतदान 86,198 झालं होतं. शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडूनही मतदारांना उद्धव ठाकरे आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेप्रती प्रेम असल्याचं सिद्ध झालं होतं. शिवसेनेची मतं अजून वाढल्याने ही भाजप आणि शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली गेली. आपण तोंडावर पडून पूर्ण पोलखोल होणार याची चुणूक शिंदे गटाला आधीच लागली होती, म्हणून ते या निवडणुकीपासून लांब राहिले होते. मात्र आता ते कधीच न वापरलेल्या ढाल-तलवार चिन्हावरून अजब दावे करत आहेत.

ग्राम पंचायत निवडणुकीत पक्ष चिन्हं नसतं, पण शिंदे काय म्हणाले :
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हिंमत असेल तर निवडून येऊन दाखवा असं आव्हान विरोधकांकडून दिलं जात होतं. त्यावर शिंदे गटाकडून काहीच प्रतिक्रिया दिली जात नव्हती. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या बंडानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आम्ही भरघोस मतांनी विजयी झालो आहोत. काही लोक आम्हाला निवडणूक लढवण्याचं आव्हान देत आहेत. मी त्यांना सांगतो. हाच ट्रेंड येणाऱ्या निवडणुकीतही राहणार आहे, असं जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले :
शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला, तसेच आज नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोके आणि धोक्यासाठी काही लोक तिकडे गेले, मात्र जे निष्ठावंत आहेत ते अजूनही आमच्याच सोबत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील राजकीय पातळी घसरली आहे. राज्यात कुठलीही नवीन गुंतवणूक नाही. राज्याला सध्या पुढे नेण्याची गरज आहे. मात्र राज्यात एक सीएम तर दुसरा स्पेशल सीएम त्यामुळे गुंतवणूक होत नाही. हे सरकार लवकरच पडेल असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde statement during Nashik Shivsena leaders joining Shinde Camp check details on 06 January 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x