14 December 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

माजी IAS अधिकारी राजीव अग्रवाल यांची फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलीसी प्रमुख पदी नियुक्ती

Former IAS Rajeev Agrawal

नवी दिल्ली, २० सप्टेंबर | २० सप्टेंबर रोजी फेसबुक इंडियाने माजी आयएएस अधिकारी आणि उबरचे माजी कार्यकारी राजीव अग्रवाल यांची सार्वजनिक धोरण संचालक म्हणून नियुक्ती केली. ह्याआधी ह्या पदावर अंखी दास काम करायच्या. मागे देशातील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांविरूद्ध द्वेषयुक्त विधान केल्यामुळे त्या वादातही सापडल्या होत्या.

माजी IAS अधिकारी राजीव अग्रवाल यांची फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलीसी प्रमुख पदी नियुक्ती – Former IAS Rajeev Agrawal has been appointed as Facebook India’s head of public policy :

या पदावर रुजू झालेले अग्रवाल भारतातील फेसबुकसाठी महत्त्वाचे धोरण आणि विकास उपक्रमांची नवीन व्याख्या बनवण्याचा प्रयत्न करतील. तसेच युजर्सची सुरक्षा, डेटा संरक्षण, गोपनीयता आणि इंटरनेट प्रशासन यांचाही समावेश असेल. या संबंधीही महत्त्वाचे बदल करण्यावर विशेष भर देण्यात येईल असे स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आले आहे. राजीव अग्रवाल फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना रिपोर्टिंग करतील. ह्याआधी अग्रवाल उबर कंपनीमध्ये भारत आणि दक्षिण आशियासाठी सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख म्हणून काम करायचे. (Facebook public policy India head Rajeev Agrawal)

अग्रवाल यांना भारतीय प्रशासकीय अधिकारी (IAS) म्हणून २६ वर्षांचा मोठा अनुभव आहे. उत्तर प्रदेश राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी बौद्धिक संपदा हक्कांवरील भारताचे पहिले राष्ट्रीय धोरण (IPRs), उद्योग आणि अंतर्गत व्यापारच्या (M/o कॉमर्स) संवर्धन विभागात सहसचिव म्हणून देखील काम केले आहे.

जागतिक अर्थ व्यवस्थेत डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येतंय. अशावेळी अग्रवाल यांच्या नेमणूकीमुळे ट्रान्सपरंसी, जबाबदारी, सशक्त आणि सुरक्षित समुदाय या मुख्य मुद्यावर काम केले जाईल अशी अपेक्षा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Former IAS Rajeev Agrawal has been appointed as Facebook India’s head of public policy.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x