15 May 2021 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
x

खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ, देशमुखांकडे गृह, थोरातांकडे महसूल

NCP, Congress, Shivsena, MahaVikas Aghadi

मुंबई: मागील ६ दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केलं असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:कडे सामान्य प्रशासन तसेच विधी व न्याय ही खाती ठेवणार आहेत. सामाजिकदृष्ट्या दोन महत्त्वाच्या खात्यांपैकी आदिवासी विकास खाते काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सी. पाडवी यांच्याकडे, तर सामाजिक न्याय खाते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविले आहे. नवनियुक्त मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. मात्र त्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यपालांनी खातेवाटपावर सही करण्यास विलंब केल्याचा आरोप करत नाराजीचा सूर आवळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच खातेवाटपावरून सही करण्यास राज्यपालांनी विलंब केल्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.

 

Web Title:  Maharashtra State Cabinet Distribution of portfolios list.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(378)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x