27 March 2023 9:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही   Raymond Share Price | रेमंड शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, स्टॉकची टार्गेट प्राईस पहा
x

Rishabh Pant Accident | भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात, अत्यंत गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त

Rishabh Pant Accident

Rishabh Pant Accident | भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत एका रस्ते अपघातात जबर जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी येत असताना पंतची गाडी दुभाजकाला धडकली. त्याला डेहराडूनच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत नुकताच टीम इंडियासोबत बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्याने कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली आणि मालिकेत संघाला २-० असा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, सध्या त्याला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. याच कारणामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

या माहितीनुसार, हा अपघात मंगलोर पोलीस स्टेशन परिसरात झाला आहे. रिषभ पंतच्या पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतवर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ते मैदानापासून बराच काळ दूर राहू शकतात. ऋषभ पंतला आईला सरप्राईज द्यायचे होते आणि म्हणून तो रात्री उशिरा आपल्या कारमधून दिल्लीहून एकटाच रूरकीच्या दिशेने निघाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला अचानक डुलकी लागली, ज्यामुळे हा अपघात झाला. त्याची प्रकृती सध्या ठीक आहे.

वनडे आणि टी-२०मध्ये ऋषभ पंतची कामगिरी चांगली नव्हती. याच कारणामुळे तो अनेकदा चाहत्यांसोबतच समीक्षकांचेही लक्ष्य बनला होता. मात्र कसोटीत त्याने आपली दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. मात्र, आता फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा प्रवेश होण्याबाबत साशंकता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rishabh Pant Accident during going to home check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

#Rishabh Pant Accident(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x