14 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IPL 2023 RR Vs RCB | आज ऑरेंज कॅप आणि प्लेऑफसाठी जयपूरमध्ये दोन रॉयल संघ आमनेसामने, कसा असेल संघ?

IPL 2023 RR Vs RCB

IPL 2023 RR Vs RCB | जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज दोन रॉयल संघ आमनेसामने येणार आहेत. या रॉयल संघांमध्ये एक राजस्थान रॉयल्स आणि दुसरा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा समावेश आहे. हा सामना केवळ दोन संघांमध्येच नाही, तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सध्या अव्वल स्थानी असलेल्या दोन खेळाडूंमध्येही होणार आहे. त्यामुळे जयपूरमधील स्पर्धा जोरदार होणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, कारण डबल हेडर सामन्यातील हा पहिला सामना असेल.

प्लेऑफच्या शर्यतीत अभिमानाने टिकून राहण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. राजस्थानच्या संघाने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर बंगळुरूने आतापर्यंत 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आज जो संघ पराभूत होईल तो स्वत:च्या बळावर प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाही. त्यामुळे हा सामना रंजक ठरणार आहे. याशिवाय या यादीत अव्वल स्थानी असलेल्या दोन फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅपसाठी लढत होणार आहे.

आरसीबीचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या दोनमध्ये आहेत. फाफ त्यांच्यापुढे असला तरी धावांचा फरक फक्त एका धावाचा आहे. फाफने आतापर्यंत 576 धावा केल्या आहेत, तर यशस्वी जयस्वालने 575 धावा केल्या आहेत. जयस्वालने आणखी एक डाव खेळला आहे. या सामन्यात जो जास्त धावा करेल त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप असेल. त्यामुळे हा सामना पाहायला विसरू नका.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IPL 2023 RR Vs RCB Orange Cap Playoff Match LIVE check details on 14 May 2023.

हॅशटॅग्स

#IPL 2023 RR Vs RCB(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x