महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या

अकोला: अकोला जिल्ह्यातील बॉक्सरपटू प्रणव राऊत याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील शास्त्री स्टेडीयम जवळ असलेल्या क्रीडा प्रबोधिनीत त्याने गळफास घेतला. प्रणव राऊत हा राष्ट्रीय पातळीवरील सूवर्णपदक विजेता खेळाडू आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर क्रीडा वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज (शुक्रवार, २१ फेब्रुवारी) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
प्रणवनं महाराष्ट्रासाठी अनेक सुवर्णपदक जिंकली होती. मात्र त्यानं अचानक उचलेल्या या पावलामुळं त्याच्या प्रशिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. प्रणवनं सकाळी नऊच्या सुमारास शास्त्रीय स्टेडियम जवळील क्रिडा प्रबोधनी येथे गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही वेळाने क्रीडा प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रीडा प्रमुखांनी रामदास पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी प्रणव आदल्या दिवशी सराव करत असल्याचेही सांगितले. पोलीस तपास करत असून अद्याप याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.
प्रणव कालपर्यंत ठिक होता. त्याच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात नसल्याचे मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी सांगितले. वयाच्या २२व्या वर्षी प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. प्रणवच्या आत्महत्येमुळे अकोला आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Story Akola gold medalist boxer Pranav Raut commits suicide in Hostel.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER
-
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL
-
Income Tax e Filing | 12.5 लाख, 15 लाख आणि 20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदारांनाही होणार फायदा, पहा किती
-
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल