24 September 2020 10:14 PM
अँप डाउनलोड

कांगारुंची झुंज अपयशी, विराटसेनेचा यजमानांवर विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने कांगारूंवर ३१ धावांनी विजय मिळवला आहे. कांगारुंपुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा दुसरा डाव २९१ धावांतच गुंडाळला. ऑलराऊंडर पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी जोमाने केली करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली. भारताच्या तेज गोलंदाजीपुढे कांगारुंचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांवर १-० अशी आघाडी घेतली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कांगारूनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चार बाद १०४ या धावसंख्येवरुन अंतिम दिवसाचा खेळ सुरु झाला. दरम्यान, पहिल्याच सत्रात ट्रेव्हिस हेड केवळ १४धावा करून लगेचच तंबूत परतला. अर्ध शतक ठोकून शॉन मार्श सुद्धा तंबूत परतला आणि त्याने एकूण ६० केल्या. त्यानंतर सत्रात उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पेनने झुंझार खेळी केली. त्यानंतर उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने सहा गडी गमावत १८६ धावांचा पल्ला गाठला.

दुसऱ्या सत्रात भारतीय जलद गोलंदाजांनी उत्तम खेळी करत कप्तान पेनला ४१ धावांवर तंबूत परतवले. त्यानंतर शमीने स्टार्कला २८ धावांवर तंबूचा धाडले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय टीमने पहिल्या डावात २५० धावा पूर्ण केल्या होत्या, तर कांगारूंचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला होता.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x