1 May 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा?
x

सुशांत आत्महत्या मागील राजकीय खेळ खल्लास | रिपोर्टमध्ये सत्य उघड

AIIMS Dr Sudhir Gupta, Sushant Singh Rajput Death Case, CBI

नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने करण्यात आला आहे, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ते ‘महाराष्ट्राची शान’ या ‘झी २४ तास’च्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

कोरोना संकटात जीवावर उदार होऊन लोकांचं रक्षण करणाऱ्या कोरोना योद्धा पोलिसांचा विशेष सन्मान ‘झी २४ तास’च्यावतीने करण्यात आला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आणि मुंबई आयुक्त परमबीर सिंग उपस्थितीत होते.

 

News English Summary: Sushant Singh Rajput’s death was a suicide, and not murder, Dr Sudhir Gupta, who led the AIIMS panel re-evaluating the actor’s post-mortem report, has said. Many, including Sushant’s family, had been urging the Central Bureau of Investigation to initiate a murder probe in the case. “Sushant death is a case of suicide. Murder completely ruled out,” the doctor said, according to India Today. The AIIMS doctors had submitted their findings to the CBI on September 29.

News English Title: AIIMS Dr Sudhir Gupta Ruled Out Murder Angle In Sushant Singh Rajput Death Case Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x