13 May 2021 8:25 AM
अँप डाउनलोड

कोण अफवा पसरवत आहे? ना अक्षय शहीद मेजर राणेंच्या कुटुबीयांना भेटला, ना आर्थिक मदत केली

मीरारोड : आधी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने खोटी ओडियो क्लीप व्हायरल करण्यात आली होती. तर आता समाज माध्यमांवर अशी अफवा पसरवली जात आहे की शहीद मेजर कौस्तुभ राणे कुटुंबीयांच्या घरी पहाटे ३ च्या सुमारास अभिनेता अक्षय कुमार गेला आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत सुद्धा केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

समाज माध्यमांवर अशी अफवा पसरवताना अक्षय कुमारने त्यांच्या कुटुंबाला नऊ लाखांची मदत केली आहे आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जवाबदारी सुद्धा स्वीकारली आहे असं वायरल संदेशात म्हटलं जात आहे. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी या सर्व अफवांचे खंडन केले असून, अक्षय कुमार आमच्याकडे आला नसल्याची माहिती दिली आहे.

या सर्व प्रकारावर शहीद मेजरचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. लोकांनी विचार तसेच खात्री न करता असले संदेश व्हायरल करुन मन:स्ताप देऊ नये, अशी विनवणी केली आहे. तसेच या प्रकाराने एका शहीद कुटुंबाला नाहक त्रास दिला जात असल्यामुळे राग व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या मेजर यांच्या पश्चात त्यांची वृध्द आई, वडिल, बहिण, पत्नी आणि २ वर्षांचा चिमुकला मुलगा आहे. मेजर कौस्तुभच्या वीरमरणाबद्दल कुटुंबीयांना अभिमान आहे. तेवढंच घरातला एेकमेव तरुण गेल्याचं दुख:ही खूप मोठे आहे. त्यामुळे आमच्याबद्दल कोणतीही अफवा पसरवून नाहक त्रास देऊ नये अशी विनंती त्यांचं कुटुंब करत आहे.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x