20 June 2021 10:25 PM
अँप डाउनलोड

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती पुन्हा खालावली असून त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या सर्वच जेष्ठ नेत्यांनी एम्स’कडे धाव घेतली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नरेंद्र मोदी जवळपास ४० मिनिटे एम्समध्ये होते. प्रकृती आणि वयोमानामुळे त्यांच्यावर ११ जूनपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात येत आहेत. परंतु आज पुन्हा एकदा एम्समध्ये दाखल करण्यात आल्याने सर्व चर्चांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जावून अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

हॅशटॅग्स

BJP(441)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x