19 May 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार

PM Narendra Modi, Lockdown, Corona Crisis, Covid19

नवी दिल्ली, १३ एप्रिल: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार हे मंगळवारी सकाळी १० वाजता कळू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ तारखेला संपत आहे. त्याच दिवशी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते पुढील निर्णय काय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

देशातील एकूण १०० जिल्ह्यांमध्ये स्थिती चिंताजनक आहे. तिथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन अधिक कडक करणे, गरजेप्रमाणे संचारबंदी लागू करणे आवश्यक आहे. पण हे जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात कामकाज सुरू करण्यावर सरकार विचार करीत आहे. नरेंद्र मोदी या पार्श्वभूमीवर काय घोषणा करतात हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

दरम्यान, ओदिशा, पंजाब, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांनी लॉकडाऊन वाढवणार असल्याचं अगोदरच जाहीर केलं आहे. केंद्र सरकारही सध्या सुरू असलेलं २१ दिवसांचं लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची शक्यता आहे. पण राज्यांचं लॉकडाऊन असतानाही केंद्राच्या लॉकडाऊनची काय गरज? असाही प्रश्न निर्माण होतो.

News English Summary: In the wake of the outbreak of the Corona virus and the demand for many states to maintain lockdown, Prime Minister Narendra Modi will know at 10 A. M. on Tuesday what will be the decision. The 21-day lockdown announced by Prime Minister Narendra Modi to curb the situation in the country is ending on the 14th. PM Modi will address the country at 10 in the morning. Therefore, the country is paying attention to what they decide next.

News English Title: Story PM Narendra Modi to address the Nation over Lockdown Corona Crisis Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x