सामना'त खिल्ली उडवल्याने पुसदच्या न्यायालयाने कोणाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते?

यवतमाळ : शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’ मुखपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून त्यात मराठा समाजातील तरुण तरुणींना ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवलं होतं. दरम्यान मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने एप्रिल महिन्यात अटक वॉरंट जारी केला होते याची किती जणांना कल्पना होती. समन्स बजावून देखील सर्व आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या हक्कावर शिक्कामोर्तब केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सध्या रंगली आहे आणि त्यावरून अनेक पुरावे मराठा समाजातील युवक व्हायरल करत आहेत. तसेच आता विनोद पाटलांवर देखील संधीसाधू अशी टीका होऊ लागली असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठीच हा खटाटोप केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेतील वरिष्ठांनीच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विनोद पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना मातोश्रीवर घेऊन जाण्याची घाई केली आणि या विषयाचे क्रेडिट घेण्याची योजना आखल्याचे बोलले जाते आहे. पेशाने वकील असलेले शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये महत्वाची बजावल्याचे बोलले जाते आहे. असं असलं तरी विनोद पाटील यांच्यापेक्षा मैदानावर आणि मैदानाबाहेर सर्वाधिक मेहनत ही आमदार निलेश राणे यांनी घेतल्याचे पाहायला मिळाली होती. तसेच मराठा आरक्षणाचा मसुदा तयार करणाऱ्या राणे समितीची देखील यामध्ये महत्वाची भूमिका होती. दरम्यान उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर स्वतः निलेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात ते टिकावे म्हणून आधीच कॅव्हेट दाखल केले आहे. मात्र शिवसेनेने केंद्रित घेण्यासाठी थेट विनोद पाटलांनाच विधानसभा निवडणुकीचे आमिष दाखवून मातोश्रीवर निमंत्रण दिले आणि हवा स्वतःच्या बाजूने हवा निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रचार केल्याचे पाहायला मिळले होते.
स्वतः निलेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात ते टिकावे म्हणून आधीच कॅव्हेट दाखल केले आहे.
दरम्यान राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चा संदर्भात दैनिक सामनामधून व्यंगचित्राद्वारे ‘मुका मोर्चा’ असे संबोधून संपूर्ण मराठा समाजाची खिल्ली उडवून अपमान केल्याची तक्रार पुसदचे अॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी दाखल केली होती. २२ एप्रिल रोजी या तिघांनाही न्यायालयात हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते न्यायालयासमोर उपस्थित न झाल्याने न्या. बाजड यांनी सोमवारी या तिघांविरुद्ध वॉरंट बजावले होते. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई हे सध्या सामनामध्ये नाहीत. त्यांना समन्स बजावण्यात आला होते.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाने मूक मोर्चे काढले होते. राज्यभर अत्यंत शांततेत, अहिंसात्मक पद्धतीने मराठा समाजाने मोर्चे काढले होते. अनेक संघटनांनी, समाजांनी, राजकीय पक्षांनी मराठा समाजाच्या मूक मोर्चांचे कौतुक केले होते. प्रसंगी पाठिंबाही दिला होता. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मराठा समाजाच्या या मूक मोर्चांची खिल्ली उडवण्यात आली होती. मात्र अॅड. विनोद पाटील यांनी या सर्व विषयांकडे दुर्लक्ष करत स्वतःचा फायदा पाहिल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
मराठा समाजाच्या मूक मोर्चादरम्यान ‘सामना’त प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रातून, या मोर्चांना ‘मूका मोर्चा’ म्हणण्यात आले होते. या व्यंगचित्रानंतर शिवेसना आणि त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’विरोधात मराठा समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. शिवसेनेकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र, संतप्त आणि नाराज मराठा समाजातील व्यक्तींनी ठिकठिकाणी ‘सामना’विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. मराठा समाजाच्या वतीने दैनिक सामनाची होळी करण्यात आली होती. तसेच उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांचे प्रतिकात्म पुतळे जाळण्यात आले होते.
Web Title: Abusive words used against maratha kranti morcha warrant against shivsena chief uddhav thackeray and MP sanjay raut
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या
-
Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
-
Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये आहेत | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Fuel Prices | मोदी सरकार जनतेला अजून धक्का देण्याच्या तयारीत | पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ होणार
-
Hot Stock | हा स्टॉक 32 टक्के परतावा देऊ शकतो | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
-
Multibagger Stock | या 15 रुपयाच्या शेअरने १ लाखाच्या गुंतवणुकीचे 15 लाख रुपये केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या