13 April 2021 7:59 PM
अँप डाउनलोड

उमेदवारीसाठी भाजपला ३० लाखाचा चेक झळकावून दाखवला, पण शिवसेनेने प्रवेश दिला

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्याने पक्षातर्फे घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान थेट ३० लाखाचा चेक झळकावला होता. भाजपच्या या सक्रिय कार्यकर्त्याचे सचिन चौगुले असं नाव असल्याचं समोर आलं आहे. परंतु त्याच धनवान भाजप कार्यकर्त्याला शिवसेनेने प्रवेश दिल्याने सांगलीत त्या ३० लाखाच्या चेकची चर्चा रंगली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपमध्ये उमेदवाराकडे धनशक्ती असणं हाच जर निकष असेल तर माझ्याकडे ३० लाखाचा चेक आहे असं म्हणत त्याने तो हवेत झळकावला होता आणि मुलाखतीदरम्यान प्रकाश झोतात आला होता. त्याने अचानक केलेल्या कृत्याने उपस्थित भाजप नेत्यांची भंबेरी उडाली होती आणि पक्षाची नाचक्की होण्याची वेळ आली होती.

परंतु भाजपकडून उमेदवारीसाठी ३० लाखाची गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्या सचिन चौगुले’ची धनशक्ती सर्वच पक्षांच्या समोर आली असावी. त्यामुळे सांगलीतील अनेक पक्षांनी उमेदवारी बहाल करण्यासाठी हालचाली केल्या असाव्यात. परंतु या धनवान भाजप कार्यकर्त्याला अखेर शिवसेनेने जाहीर प्रवेश दिला आहे. त्यामुळे सचिन चौगुलेंच्या शिवसेना प्रवेशाने त्याच्याकडील ३० लाखाच्या चेकची चर्चा सर्वाधिक रंगली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1075)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x