23 March 2023 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार?
x

सरकार तर स्थापन करणार अन मध्यावधी निवडणूक सुद्धा होणार नाहीत: शरद पवार

NCP, Sharad Pawar, Congress, Shivsena
मुंबई: भारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील बेबनावामुळं महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मनाने जवळ आले आहेत. इतकेच नव्हे, हे नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बैठका घेऊ लागले आहेत. त्यांच्यातील या जवळीकीमुळं राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेची शक्यता बळावली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचं चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का, याची चर्चा जोर धरू लागली आहे. नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. याबाबत शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत भाष्य केल्याची माहिती आहे. ‘आमदारांनी चिंता करू नये. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार नाही,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधताना, राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी चिंता काही करायचं नाही सांगितलं. तसंच आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही सांगत तुमच्या मतदारसंघांमध्ये जाऊन जनतेची काम करा असा आदेशही दिला आहे. आमदारांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांवर देण्यात आली आहे.
याचबरोबर, या बैठकीत समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची ५-५ जणांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक होऊन चर्चा होणार आहे. आमच्या दोन पक्षात एकवाक्यता झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे. महत्वाच्या पदासंदर्भात चर्चा होईल आणि मार्ग काढला जाईल. तसेच या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा करण्यासाठी ही समिती ठरविली गेली. महाराष्ट्रातील चर्चा लवकरात लवकर संपविण्याचा निर्णय घेणार आहे.”

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x