6 May 2021 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर नाशिक महापालिकेतील ऑक्सिजन दुर्घटना सत्ताधारी भाजपने नेमलेल्या ठेकेदारामुळेच | चौकशी समितीचा अहवाल मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होईल | योग्य खबरदारी घ्या - सुब्रमण्यम स्वामी
x

दिलासादायक | राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येतंय, मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला

Maharashtra corona pandemic

मुंबई, ०४ मे | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्यात आज 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे.

दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे. राज्यात मुंबई , ठाणे, औरंगाबाद, जळगाव सह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटनांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सह सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी गेल्या पाच आठवड्यांचा आलेख सादर केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे.

आलेखानुसार शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद कमी झाल्याचे दिसत आहे. यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४ ते १७ एप्रिल या कालावधी रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्याचे आढळले. त्यानंतर त्यात घट झालेली आहे.

 

News English Summary: There is good news in the crisis caused by the growing number of corona patients. The number of new patients is declining in Maharashtra. The number of new patients is increasing in 12 districts of the state including Mumbai, Thane, Aurangabad and Jalgaon. The number of Corona patients is flat in 13 states including Maharashtra and the number of new patients in these states will soon be declining, the health department said.

News English Title: The number of new patients is declining in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1341)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x