20 April 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलची भाव वाढ सुरु - काँग्रेस

Petrol Diesel

मुंबई, ०४ मे | देशातील ४ राज्यांमधील आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका आता संपल्या आहेत. त्यात प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या प्रमुख तीन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे. केवळ आसाम राखण्यात त्यांना यश आलं आहे. तर पुद्दुचेरीत आधीच पक्ष फोडाफोडी करून जे घडलं होतं तेच घडलं. मात्र निकालानंतर मोदी-शहा यांची राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता त्याचे इतर परिणाम देखील सुरु झाले आहेत आणि ते थेट सामान्य लोकांशी संबंधित आहेत.

कारण निवडणुका संपताच पेट्रोल डिझेलच्या किंमतीत जवळपास दोन महिन्यांनी वाढ झाली आहे. या आआधी 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ झाली होती. आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत दिल्लीमध्ये 15 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 18 पैसे प्रती लीटर वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या बाजारात पेट्रोलचा दर 90.55 रुपये तर डिझेलचा दर 80.91 रुपये झाला होता.

देशात निवडणुकांचा काळ असल्याने गेल्या 66 दिवसांत कच्चे तेल महागले तरीही पेट्रोल, डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Price) वाढ झाली नव्हती. मात्र, याच काळात कच्च्या तेलाच्या किंमती जेव्हा जेव्हा कोसळल्या तेव्हा चारवेळा पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. यामुळे पेट्रोल 77 पैशांनी स्वस्त झाले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या आठवड्यात मोठी वाढ पहायला मिळाली. यामुळे कच्चे तेल गेल्या सहा आठवड्यांच्या किमतीपेक्षा जास्त वाढले होते. मात्र, शेवटच्या दिवशी डॉलर मजबूत होणे आणि ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याची घोषणा केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घट दिसून आली. दरम्यान यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलची भाव वाढ सुरु”.

 

News English Summary: Petrol and diesel prices have risen by almost two months since the election. Earlier, on February 27, petrol price was hiked by 24 paise and diesel by 17 paise. Now, two months later, petrol prices have gone up by 15 paise per liter in Delhi and diesel by 18 paise per liter.

News English Title: Petrol diesel prices started increasing after 5 states Assembly election result news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x