6 October 2022 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wrinkle Remedies | त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण वाढले आहे?, खास घरगुती उपायांसाठी या टिप्स फॉलो करा Airtel 5G Service | आजपासून देशातील या 8 शहरांमध्ये एअरटेल 5G सेवा सुरु, संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या Surya Rashi Parivartan | ज्योतिषशास्त्रानुसार येणारे 11 दिवस या राशींच्या लोकांसाठी वरदानासारखे असतील, सूर्य राशी परिवर्तनाचा परिणाम Trending Video | शिकार पाहिली आणि अजगराने झाडावर वेगाने चढत हल्ल्याची तयारी केली, व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल Penny Stocks | या शेअरने हजारो पटीत परतावा, 3 वर्षांत एक लाखावर 1 कोटी 25 लाखाचा परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा Horoscope Today | 07 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल
x

राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज होती; आता सर्व मिळून भाजपला विरोधात बसवणार

MNS, Raj Thackeray, BJP

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच सभांमधून राज्याला एका सक्षम विरोधीपक्षाची गरज असल्याचं वारंवार म्हटलं होतं. एकूणच ढासळत्या लोकशाहीत विरोधीपक्षाचं महत्व राज ठाकरे यांनी मतदाराला वारंवार समजावून सांगितलं. मनसेला निकालाअंती मोठं यश प्राप्त झालं नसलं तरी त्यांनी केलेल्या आवाहनानंतर मतदाराने जे मतदान केलं, त्यानंतर थेट भाजप, म्हणजे १०५ आमदार असलेला सर्वात मोठा पक्ष झाला असून तोच आता विरोधी पक्षात बसणार असं प्राथमिक चित्र निर्माण झालं आहे.

तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले असून हे आमंत्रण फडणवीस स्वीकारणार का? बहुमताच्या अग्निपरीक्षेला ते सामोरे जाणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार होते.

दरम्यान, मार्ग निघत नसल्यानं अखेर पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झाली होती हे. विशेष म्हणजे या बैठकीत भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे कोअर कमिटीच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार होते. मागील दोन आठवड्यांपासून राजकीय गोंधळ सुरू असताना अमित शाह यांचं नाव फारस पुढे आलं नव्हत. आता आज पहिल्यांदाच अमित शाह यांनी सत्तेचा पेच सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचं समजलं वृत्त आलं.

मात्र राजभवनाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटलं की, जनतेने जनादेश भाजप आणि शिवसेनेच्या युतीला दिला होता. मात्र शिवसेनेने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असं म्हटलं आहे. मात्र ही देताना भाजपच्या सर्व नेत्यांचे चेहरे रडकुंडीला आल्याचे स्पष्ट दिसत होते, तर काहींनी जबरदस्ती चेहऱ्यावर स्मित हास्य दाखवत होते. त्यामुळे भाजपने विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतल्याचं आता स्पष्ट झाला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांना जयपूरला हलविले आहे. तेथे राज्यातील नेते कालच पोहोचले असून आमदारांशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितले. मात्र, काँग्रेसच्या नेत्याना सोनिया गांधी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग3ेस राष्ट्रवादीला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल मिळाल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(715)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x