12 December 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

भाजपच्या भूमिकेने विनायक मेटे, सदाभाऊ खोत आणि मेटेंच्या राजकारणाला यु-टूर्न?

Vinayak Mete, Sadabhau Khot, Mahadev Jankar

मुंबई : भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या पक्षाला विसरून भाजपचे अघोषित प्रवक्ते होण्यास भाग पाडलं होतं. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, स्वतःचे पक्ष विसरून भाजपाच्यामागे फरफटत गेले आणि आज त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्य आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

या पक्षाच्या प्रमुखांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महादेव जाणकार आणि सदाभाऊ खोत हे राज्य मंत्रिमंडळात होते, तर रामदास आठवले हे केंद्रात मंत्रीपदी आहेत. त्यात कोणतीही राजकीय शक्ती नसलेले विनायक मेटे यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचं अध्यक्ष पद आणि शासनाच्या खचातून २० लाखाची गाडी बहाल करण्यात आली होती. वास्तविक या सर्व नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वात नसलेली ताकद आणि त्याची जाणीव त्यांना नसणार असा विषय नसून, स्वतःचे स्वार्थ साधून त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांचे भविष्य भाजपच्या दावणीला लावल आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात विकासाच्या कामगिरीवर या नेत्यांबद्दल न बोललेलंच बरं.

भाजपने या चारही पक्षातील प्रमुखांना सत्तेत खुश करून त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे वापरलं. त्यात पक्ष वेगळे असले तरी त्यांना निवडणूक देखील भाजपच्या कोट्यातून आणि चिन्हांवर लढवावी लागली. मध्यंतरी या चारही नेत्यांनी एकत्र येऊन भाजपवर दबाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने एका हॉटेलमध्ये बैठक देखील बोलावली, मात्र भाजपने त्याकडे ढुंकूनही पहिले नाही आणि हे नेते पुन्हा शांत झाले. आमचा पक्ष आहे हे दाखवण्यासाठी, दरवर्षी केवळ पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यापलीकडे त्यांच्या हातात सध्या काहीच नाही. अनेक वेळा विधासनसभा निवडणुकीच्या तोंडावर १०-१५ जागांची मागणी केली जाते, मात्र इथे शिवसेनेची डाळ शिजत नव्हती तिथे या पक्षांना कोण विचारणार अशी अवस्था होती. त्यामुळे पक्ष वेगळे असले तरी त्यांच्या अध्यक्षांना भाजपच्या तालावर नाचण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, पण कार्यकर्त्यांचं काय? उद्या ते दुसरा पक्ष निवडतील असंच काहीस साध्याच राजकरण आहे.

दरम्यान, रासपला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी अधिक जागांवर लढण्याबरोबर पक्षाच्या चिन्हावर लढणे आवश्यक होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढणार नाहीत तर रासपच्या चिन्हावर लढतील, असे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व पशुपालन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले होते. मात्र दौंड विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल आणि ते निवडून देखील आहे, मात्र भाजपच्या चिन्हावर आणि त्यामुळे आताच्या राजकीय परिस्थतीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला तोदेखील जोरदार राजकीय धक्का मानला जातो. कारण महायुतीमध्ये रासपच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार हे कमळ या चिन्हावर नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी भूमिका महादेव जानकर यांनी घेतली होती, पण तसे झाले नाही.

मात्र केवळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची स्तुती करत मंत्रिमंडळात टिकून राहणं एवढाच कार्यक्रम या नेत्यांना केला. मात्र आता भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतल्याने या नेत्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय भवितव्य अधांतरी असल्याचं सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं किती गरजेचं असतं हे जरी या नेत्यांना भविष्याचा विचार करून समजल्यास बरं होईल असं अनेकांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x