25 June 2022 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 35519% रिटर्न | 50 हजाराचे 1 कोटी 78 लाख झाले शिंदेंकडून प्रॉपर्टीवर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर | पण पक्षासाठी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर होणार? भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड
x

राज्य होरपळतंय दुष्काळात आणि लोकसभेत भाषणं ठोकून उद्धव ठाकरे परदेशात?

Shivsena, Udhav Thackeray, Loksabha Election 2019

पुणे: सध्या महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ लोटला आहे. विशेष म्हणजे दुष्काळाची तीव्रता ही ऐतिहासिक असल्याचं म्हटलं जात आहे. लोकसभेच्या प्रचारात मोठं मोठी भाषणं ठोकून सत्तेत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेले असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः राज्यातील दुष्काळाचा आढावा घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणतंही सत्ताकेंद्र स्वतःकडे नसताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकाराने ग्रामीण भागात शक्य इथे टँकरने पाणी पोहोचवत आहेत.

येत्या १७ तारखेला ठाण्यात देखील शेतकऱ्यांसाठी मनसेने शेतकरी राजाच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित केला आहे. मात्र उद्धव ठाकरे या महत्वाच्या आणि जवाबदारीच्या कार्यकाळात परदेश दौऱ्यावर गारवा अनुभवत आहेत असं वृत्त आहे. लोकसभेच्या निकालाधी ते पुन्हा परत येतील आणि थेट भाजपसोबत बार्गेनिंग करण्यात व्यस्त होतील असंच काहीस चित्र आहे.

दरम्यान, येत्या २०-२५ दिवसात पावसाचे आगमन होईल आणि त्यात दुष्काळाचे मुद्दे पुसले जातील याची त्यांना पूर्ण कल्पना असावी. तसेच त्याच कार्यकाळात ते विधानसभेच्या कामाला लागतील, कारण पाऊस संपताच राज्य सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे सत्तेत राहून उद्धव ठाकरे मूळ विषयात लक्ष न घालता, पुढील ५-६ महिने केवळ निवडणुका आणि निवडणुकीनंतरची बार्गेनिंग यातच व्यस्त दिसले तर नवल वाटायला नको.

हॅशटॅग्स

#Shivsena(1154)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x