13 May 2021 2:06 AM
अँप डाउनलोड

शुक्रवारी मनसेचा ठाण्यात शेतक-यांसाठी महामोर्चा, राज्यभरातून शेतकरी घेणार सहभाग

MNS, Raj Thackeray, Loksabha Election 2019

ठाणे : ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आंब्याच्या स्टॉलवरून मोठा राडा झाला होता. त्यात कोकणातील सामान्य शेतकऱ्याचा आंब्याचा स्टॉल हटवण्यासाठी आलेल्या भाजपच्या ठाणे जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवकाला चोप देण्यात आला होता. त्यात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी देखील सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जर फायदा थेट शेतकऱ्यांना होत असेल तर मुळात पक्षीय मतभेद येतातच कसे असा प्रतिप्रश्न उपस्थित करत भाजपच्या त्या विरोधाला प्रतिउत्तर दिलं होतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, या मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतक-यांसाठी एल्गार पुकारला असून १७ मे म्हणजे शुक्रवारी ठाण्यात महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्याप्रमाणावर शेतकरी सहभागी होणार असून मनसेचे मुंबईसह महाराट्रातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते येणार असल्याचे मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. गावदेवी मैदान ते ठाणे महानगरपालिका दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, यावेळी अविनाश जाधव, माजी आमदार बाळा नांदगावकर, माजी आमदार नितीन सरदेसाई आदी मनसे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. ठाण्यात ९ मे रोजी मनसेने त्यांच्या कार्यालयाबाहेर आंबा विक्रीसाठी एका शेतकरी कुटुंबियांना स्टॉल लावू दिला. रत्नागिरीहून आलेल्या शेतकरयांनी लावलेला हा स्टॉल अनधिकृत असल्याचं सांगत भाजपाने हा स्टॉल हटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवले. ठाण्यात झालेल्या मेळाव्यात राज यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली. शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीचं सरकारचं धोरण आहे, मग ठाण्यातील आंबे विकणारया शेतकरयांनी काय घोडं मारलं होतं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं भलं होतंय तर त्याला विरोध का होतोय? असा सवाल राज यांनी केला.

यानंतर मनसे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आक्रमक झाली आहे. नाशिकमधले कांदा विक्रेते, सांगलीमधले ऊस विक्रेते, रत्नागिरीतील आंबा विक्रेते, पालघरमधील आदीवासी लोक जे डोंगरात शेती करतात आदी शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात ८ ते १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियही सहभागी होणार आहेत. मनसेद्वारे या शेतकरयांसाठी मैदान, हॉल येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकरी मुद्यासोबत येत्या काही दिवसांत ठाण्यातील पाणी टंचाईच्या मुद्यावरून मनसे आक्रमक होण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

काय आहेत मनसेच्या शेतकऱ्यांसाठी नेमक्या मागण्या?

  1. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटंबियांना ठाण्यात १०० स्टॉल लावण्याची मंजूरी ठाणे महानगरपालिकेने द्यावी.
  2. वर्दळीच्या ठिकाणी हे स्टॉल असावेत, जेणेकरून शेतकरयांना त्यांचा माल विकून आर्थिक लाभ होईल.
  3. ज्या भाजप नगरसेवकाने रत्नागिरीहून आलेल्या शेतकरी कुटंबियांकडून पैशांची मागणी केली त्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा.
  4. तसेच त्या शेतकरयाला त्याचा माल विकता आला नाही म्हणून नुकसान भरपाई द्यावी

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(664)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x