19 April 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंची भेट घेणार

Raj Thackeray, Land Owners, Nanar Project

मुंबई, ०८ मार्च: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा उचलला आहे आणि मात्र तो पूर्वीच्या भूमिकेशी सांगड घालणारा नसला तरी राज्याचा हिताचा असल्याचं म्हटलं जातंय. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने बासनात गुंडाळलेला नाणार प्रकल्प पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, नाणारमधील जमीन मालकांना राज ठाकरेंनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.

नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतील. यापैकी बहुतांश जण हे जमीन मालक आहेत. याशिवाय, नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी राज ठाकरे यांच्यापुढे नाणारमधील तब्बल 8500 जमीन मालकांची संमतीपत्रेही सादर करण्यात येतील. त्यामुळे आता राज ठाकरे नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

News English Summary: Raj Thackeray has invited land owners in Nanar for a meeting. Raj Thackeray has appealed to attend this meeting in large numbers. The meeting will be held at Raj Thackeray’s residence. The meeting is expected to take place at 11 a.m. today.

News English Title: Raj Thackeray has invited land owners in Nanar for a meeting at Krushnakunj news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x