26 September 2020 9:41 PM
अँप डाउनलोड

मोदी, शहांना निवडणूक आयोग शरण: काँग्रेसचा थेट आरोप

Narendra Modi, Amit Shah, BJP, Congress, Rahul Gandhi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : कोलकाता येथे मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी आणि जाळपोळ झाली. दरम्यान, या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या एकतर्फी भूमिकेवरून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर अक्षरशः शरणागती पत्करली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घालण्याचा निर्णय हा पूर्णपणे घटनाविरोधीत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बंगालमधील परिस्थितीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ”निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार १ दिवस आधीच थांबवण्याचा घेतलेला निर्णय हा मुळातच घटनाविरोधी आहे. तसेच निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या सभा विचारात घेऊन आज रात्रीपासून निवडणूक प्रचार थांबवण्याची घोषणा केली आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x