28 September 2020 10:00 PM
अँप डाउनलोड

गडकरीजी! देशातील सरकारी नोकऱ्यांबद्दल उत्कृष्ट प्रश्न विचारलात: राहुल गांधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नोकऱ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. कारण त्या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांना आयतीच संधी दिलेली आहे. त्याच विधानाचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींनी आरक्षण आणि सरकारी नोकरीची स्थिती याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल त्यांना खोचक टोला लगावला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नितीन गडकरी औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांना पत्रकारांनी मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आरक्षण नोकरी देईल याची शाश्वती नाही कारण नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. ‘समजा आरक्षण दिलं, तरी नोकऱ्या आहेत कुठे ? बँकेत आयटी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याने नोकऱ्या नाही आहेत. सरकारी नोकरभरती बंद आहे. नोकऱ्या आहेतच कुठे ?’ असं नितीन गडकरींनी म्हटलं होतं.

त्यानंतर त्यांच्यावर चारही बाजूंनी टीका करण्यात येत आहे. केंद्र सरकार मोठा रोजगार निर्माण करत असल्याचा ढोल बडवत आहेत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री यांनी सरकारी नोकऱ्यांचे वास्तव मांडल्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. त्यालाच अनुसरण राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की, ‘उत्कृष्ट प्रश्न विचारलात गडकरीजी. प्रत्येक भारतीय हाच प्रश्न विचारत आहे’.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(64)#Rahul Gandhi(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x