2 May 2024 5:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, विकास लाइफकेअर कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरला फायदा होणार?

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या सहयोगी पोर्टफोलिओ मॅनेजिंग इव्हेंट्स LLC च्या सहकार्याने भारतात 71 व्या मिस वर्ल्ड पेजंट इव्हेंटचे आयोजन करणार आहे. 2024 मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार आहे. ही आपल्यासाठी एक गौरवाची बाब आहे.

भारतात जागतिक स्तरावरील स्पर्धेचे आयोजन होणे, म्हणजे संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या देशावर असेल. विकास लाइफ केअर कंपनीची उपकंपनी पीएमई एंटरटेनमेंट देशात ‘मिस वर्ल्ड स्पर्धा 2024’ आयोजित करणार आहे. पीएमई एंटरटेनमेंट ही दुबईस्थित कंपनी मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय करते.

मिस वर्ल्ड स्पर्धेत जगभरातील 120 पेक्षा जास्त देशांतील स्पर्धक भाग घेणार आहेत. हे सर्व स्पर्धक आपल्या देशाची संस्कृती जागतिक स्तरावर प्रदर्शित करून आपल्या देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करत असतात. त्यातून एका स्पर्धकाची मिस वर्ल्ड म्हणून निवड केली जाते. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 2.31 टक्के घसरणीसह 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले 9 मार्च 2023 रोजी मुंबईस्थित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा संपूर्ण जगात प्रसारित केली जाते. या स्पर्धेचे कार्यक्रम नवी दिल्लीतील भारत मंडपमसह विविध ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. जगभरातील 120 इच्छुक स्पर्धक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

भारत पर्यटन विकास महामंडळ 20 फेब्रुवारी 2024 रोजी मिस वर्ल्ड स्पर्धेचे ऑफिशियल उद्घाटन करणार आहे. या स्पर्धेची सुरुवात इंडिया वेलकम द वर्ल्ड गालाने केली जाणार आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व स्पर्धकांनी दिल्लीस्थित महात्मा गांधींच्या राजघाट समाधीला भेट देऊन मिस वर्ल्ड 2024 कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली आहे.

विकास लाइफ केअर लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पॉलिमर आणि रबर कंपाऊंड्सचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. आता विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने मनोरंजन क्षेत्रातही व्यवसाय विस्तार केला आहे. यापूर्वी, विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या जेनेसिस गॅस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देशात स्मार्ट गॅस मीटरचा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर मिळाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 21 February 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x