12 April 2021 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

तुम्ही बँकेत किमान रक्कम न ठेवल्याने बँका मात्र मालामाल

नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नसेल कदाचित, परंतु त्यामुळे ग्राहकाला जरी दंड बसला असेल तरी बँकांची मात्र तुफान चांदी झाल्याचे समजते. कारण किमान रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून बँकांनी दंडापोटी तब्बल ५,००० कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी बँक खात्यात आवश्यक रकमेपेक्षाही कमी पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांकडून हा मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दंड वसुली करणाऱ्या या बँकामध्ये २१ सरकारी आणि ३ मोठय़ा खासगी बँकांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक वसुली एसबीआयने म्हणजे तब्बल २,४३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो एचडीएफसी बँकेचा कारण त्यांनी ५९० कोटी रुपये दंड ग्राहकांकडून वसूल केला आहे. त्यानंतर ऍक्सीस बँक ५३० कोटी रुपये तर आयसीआयसीआय बँकेने ३१७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

स्टेट बँकेच्या नव्या नियमाप्रमाणे मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या स्टेट बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यात किमान रक्कम ३, ००० रुपये ठेवणं आवश्यक असते. परंतु, जर ग्राहकाने खात्यात २, ९९९ ते १,५०० रुपये किमान रक्कम असेल तर एसबीआय ३० रुपये दंड आकारतं. तर, किमान रक्कम १४९९ ते ७५० रुपयांपर्यंत असेल तर एसबीआय खातेदारांकडून ४० ते ५० रुपये दंड आकारतं.

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)#Narendra Modi(1480)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x