लखनऊ : पश्चिम बंगालमध्ये काल घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीत लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि फार अन्यायकारक आहे. अशाप्रकारचं राजकारण पंतप्रधानपदाला न शोभणारं असल्याचा आरोप बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.

यावेळी बोलताना मायावती म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील राड्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये १ दिवस आधीच प्रचारबंदी केली. परंतु हा प्रचार रात्री १० वाजेर्यंत ठेवण्यात आला कारण पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २ सभा होणार आहेत. जर केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपाच्या दबावाखाली केल्याचा आरोपही मायावती यांनी लावला.

प.बंगालमधील घटनाक्रम हा ममतांना लक्ष करण्यासाठीच: मायावती