25 September 2020 12:09 AM
अँप डाउनलोड

कोलकात्यातील घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार: संजय राऊत

Mamta Banerjee, Sanjay Raut, Shivsena, Loksabha Election 2019

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली परिस्थिती लोकशाहीसाठी दुर्दैव घटना असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगालमधील ममता दीदींचे सरकार जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमधील हिंसाचार अतिशय दुख:द घटना आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोड शो करत असताना काही जणांनी हिंसाचार केला, तोडफोड केली. जाळपोळीची घटना घडली हे लोकशाहीसाठी अत्यंत दुदैव आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष राज्यात येत असेल तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तेथील सरकारची असते. परंतु त्या सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्या असं देखील राऊतांनी सांगितले.

कोलकाता येथे झालेल्या राड्यावर भारतीय जनता पक्षाकडून अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पराभव दिसत असल्याने मतांच्या राजकारणासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपाच्या रोड शोवर हल्ल्याच्यावेळी पोलिसांना बघ्याची भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगाल वगळता इतर कुठेच हिंसा झालेली नाही असंही अमित शहा यांनी सांगितले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(22)#Sanjay Raut(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x