12 April 2021 6:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

प्रियांका गांधी ब्रह्मास्त्र थेट वाराणसी आणि गोरखपूर'वर? ट्विट मधून संकेत

नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांच्या अचानक सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहा जोडीला पूर्ण हैराण करून सोडण्याची रणनीती आखली जाते आहे. त्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पराभूत करण्याची रणनीती आखण्यात येते आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसेच अप्रत्यक्ष संकेतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन दिले आहेत. त्यांनी प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील सक्रिय राजकारणामुळे थेट मोदीमुक्त वाराणसी आणि योगीमुक्त गोरखपूर होणार असल्याचे संकेत देत या २ मतदारसंघातून प्रियंका निवडणूक लढवणार असल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती. परंतु आता त्याचाच धागा पकडून कपिल सिब्बल यांनी अमित शहा यांना सुद्धा लक्ष केले आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘मोदी आणि शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताचे आवाहन केले होते. परंतु, आता प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात दाखल झाल्यामुळे आपल्याला …. मुक्त वाराणसी?….मुक्त गोरखपुर? पहायला मिळेल, असे म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी नेमकं काय ट्विट केले आहे?

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x