29 November 2022 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

'ठाकरे' साकारण्याची जवाबदारी पेलणारे मेंदू आता त्यांना 'लहान झाले'? नेटकऱ्यांनी झोडपले

मुंबई : काल ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि निर्माता संजय राऊत यांच्यामध्ये काही तरी वाद झाल्याचे वृत्त सुरुवातीला पसरले होते. प्रथम सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही बाजूने काहीतरी सारवासारव करण्यात येत होती. परंतु, सध्या सुरु असलेल्या ट्विटर वॉर’वरून तरी ते वाद सत्य असल्याचं समोर येऊ लागलं आहे.

कारण या प्रकरणावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिजीत पानसेंना ट्विट करून टोला लगावला आहे. दरम्यान या ट्विटमध्ये बोलताना त्यांनी ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की, संयम आणि कृतज्ञता शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हा संदेश आहे’ असे टिवट संजय राऊत यांनी केला आहे.

परंतु, संजय राऊतांना ‘ठाकरे’ सिनेमा साकारण्यासाठी जो मेंदू निवडला तोच मेंदू आता सिनेमा पूर्ण झाल्यावर लहान का वाटू लागला आहे, असे प्रश्न प्रसार माध्यमांवर विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान, प्रोमोशन सुरु झाल्यापासूनच एकूण कार्यक्रम बघितल्यास संजय राऊत यांनी क्रेडिट घेण्यासाठी अभिजित पानसे यांना लांबच ठेवले होते. त्यावरून हा सिनेमा निवडणुकीच्या निमित्तानेच बनविण्यात आला नव्हता ना? अशी शंका पुन्हा उपस्थित करण्यात येते आहे.

काय ट्विट केले आहे संजय राऊत यांनी?

त्यावर नेटकऱ्यांच्या राऊतांना खोचक प्रतिक्रिया;

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x