17 November 2019 9:54 PM
अँप डाउनलोड

चांदवडनजिक भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

चांदवड : येथील रेणुकामाता मंदिराजवळ टायर फुटल्याने कार चालकाचे गाडीवरील निरंत्रण सुटले आणि कार बसवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. दरम्यान या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील ३ जण ठार झाल्याचे वृत्त आहे आणि ते सर्व वणी येथील राहणारे आहेत.

वणी येथील सप्तशृंग पतसंस्थेचे संचालक संजय समदडीया, पत्नी वंदना समदडीया आणि त्यांचा मुलगा हिमांशु समदडीया अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. धुळे येथे एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास ते गेले होते. दरम्यान, संपूर्ण विवाहसोहळा आटोपून वणी येथे पुन्हा घराच्या दिशेने परतत असताना हा भीषण अपघात झाला. फोर्ड फिगो या कारमधुन ते घरी परतत होते असे वृत्त आहे. एस.टी बसच्या मागच्या बाजूने कार थेट खालच्या बाजूला चिरडली गेली आणि हा भीषण अपघात घडला.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या