28 June 2022 4:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच | किंमत आणि काय खास आहे पहा Pre-Approved Loan | तुम्हालाही प्री-अप्रुव्हड लोनसाठी ऑफर कॉल, ई-मेल किंवा एसएमएस येतात का? | मग हे जाणून घ्या लेट करंट? | सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं त्याचा अर्थ उशिरा कळला? | शिंदे गटाचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला सुप्रीम कोर्टाने 11 तारखेपर्यंत स्टेटस खो दिला, निर्णय नव्हे | राज्यपालांना अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही | शिंदेंचा विजयाचा उतावळेपणा Horoscope Today | 28 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल शिंदे गट फ्लोअर टेस्टसाठी जाईल? | सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर थेट आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते Hot Stocks | आज फक्त 1 दिवसात या शेअर्सनी तब्बल 40 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | स्टॉक्सची यादी पहा
x

पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही : मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : लंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा नामक हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, ईव्हीएम’वरून देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच पार पडतील हे स्पष्ट केले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात घेऊन जाण्याचा आमचा विचार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान ‘आपण यापुढे सुद्धा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करणे सुरुच ठेवणार आहोत. त्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी आम्ही मतदानासाठी जुन्या मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्या मागण्यांपुढे आम्ही झुकणार नाही’ असे सुद्धा सुनील अरोरा यांनी स्पष्ट सांगितले आहे.

हॅशटॅग्स

#EVM Machine(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x