TCS Share Price | भरवशाचा TCS शेअर! TCS शेअर उच्चांकी किमतीजवळ पोहचला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीसीएस कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 4140 रुपये किमतीवर पोहचले होते. टाटा समूहाच्या या आयटी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या स्टॉकने 2021 मध्ये 4,123 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आता पुन्हा एकदा या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीजवळ पोहोचले आहेत. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी टीसीएस स्टॉक 0.83 टक्के घसरणीसह 4,101.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
भारतात टीसीएस ही कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनी नंतरची दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टीसीएस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. तर मुकेश अंबानीं यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपये आहे.
मे 2020 मध्ये टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात टीसीएस कंपनीचा वाटा तीन-चतुर्थांश होता. मागील 10 वर्षांमध्ये प्रथमच हे प्रमाण निम्म्याहून कमी झाले आहे. टीसीएस कंपनीच्या स्टॉकची खराब कामगिरी हे त्याचे मुख्य कारण होते. मात्र आता हा स्टॉक पुन्हा एकदा आपल्या तेजीत व्यवहार करत आहे. याशिवाय टायटन, टाटा मोटर्स, ट्रेंट, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स आणि टाटा एलक्सी या टाटा समूहातील इतर कंपन्यांची कामगिरी देखील लक्षणीय राहिली आहे.
टीसीएस स्टॉकचे निरीक्षण करणाऱ्या 44 तज्ञापैकी 10 जणांनी टीसीएस स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे. तर 23 तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंगच्या तज्ञांच्या मते, टीसीएस कंपनीचे शेअर्स 4,359 रुपये किमतीवर जाऊ शकतात. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होऊन काही दिवसच झाले आहेत, या याकाळात टीसीएस कंपनीचे शेअर्स 8 टक्के मजबूत झाले आहेत.
टीसीएस कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 8.2 टक्क्यांच्या वाढीसह 11,735 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. डिसेंबर तिमाहीत टीसीएस कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 4 टक्के वाढीसह 60,583 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
या तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 0.5 टक्क्यांच्या वाढीसह 25 टक्क्यांवर पोहचले आहे. तर कंपनीचे निव्वळ मार्जिन 19.4 टक्के नोंदवले गेले आहे. कंपनीने आपल्या तिमाही निकालात दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडे सध्या 8.1 अब्ज डॉलर्स किमतीच्या ऑर्डर्स प्रलंबित आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | TCS Share Price NSE Live 07 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News