27 April 2024 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Home Loan | तुम्ही नवीन घर गृहकर्जाद्वारे घेण्याचा विचार करत असाल तर या चुका टाळा, मोठं आर्थिक नुकसान होईल

Home loan, Tax benefits

Home Loan | जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर एकूण व्याजावर आयकर कायदा 1961, कलम 24 अंतर्गत तुम्हाला करवजावट लाभ मिळतो. गृहकर्ज धारकला एका आर्थिक वर्षात कलम 24 अंतर्गत कमाल 2 लाख रुपयांची करवजावट लाभ मिळू शकतो तर घेतलेल्या कर्जाच्या एकूण मुद्दलावर कलम 80C अंतर्गत करवजावटीचा लाभ घेता येतो.

घरांच्या किंमती तुलनेने स्थिर :
जर तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी आहे. गृहकर्जाचे सध्या व्याजदर कमी झाले आहेत. आणि स्थावर मालमत्ता आणि घरांच्या किंमतीदेखील तुलनेने स्थिर होत आहेत किंवा काही अंशी घसरलेल्या आहेत. बॅंकांच्या विविध गृहकर्जावरील ऑफर्स सुरू आहेत, शिवाय बॅंकादेखील गृहकर्ज वितरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. अशा परिस्थितीत कमी व्याजदराने तुम्हाला उपलब्ध असलेले गृहकर्ज घेऊन स्वत:चे घर घेण्याची सुवर्णसंधी सर्वसांमान्याना मिळणार आहे. गृहकर्जाच्या हफ्त्यावर कर वजावटदेखील मिळते. मात्र गृहकर्ज आणि घराच्या खरेदी-विक्रीसंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी कडे द्रुलक्ष केल्यास तुम्हाला कर वजावटीचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही जो लाभ घेतला आहे तो रद्द केला जाईल. ह्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

ईएमआय चे दोन भागात विभाजन केले आहेत:
गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात. एक भाग व्याजाचा तर दुसरा भाग मुद्दलचा असतो. इन्कमटॅक्स विभाग मार्फत गृहकर्ज धारकला या दोन भागांवर वेगवेगळी कर सूट दिली जाते. व्याजाच्या भागावर कलम 24 अंतर्गत करवजावट मिळते. प्रती व्यक्ती एका आर्थिक वर्षात कलम 24 अंतर्गत कमाल 2 लाख रुपयांची करवजावट घेउ शकतो. तर मुद्दलावर कलम 80 C अंतर्गत करवजावटीचा लाभ घेता येतो. कलम 80C ची लाभ मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. एका आर्थिक वर्षात मुद्दलावर एकूण 3.5 लाख रुपयांची करवजावट लाभ घेता येते.

5 वर्षात घर विकले तर करवजावटीचा फायदा रद्द :
इन्कमटॅक्स विभागाच्या नियमानुसार जर तुम्ही गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले असेल आणि ते पाच वर्षांच्या आत विकले किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर स्थलांतर केले तर कलम 80C अंतर्गत मुद्दलावर जितका कर लाभ घेतला आहे तो तुम्हाला परत करावा लागेल. ज्या चालू आर्थिक वर्षात तुम्ही घर विकले आहे त्या वर्षात मिळालेला कर लाभ उत्पन्नामध्ये जोडला जातो आणि एकूण उत्पन्नावर कर्जदात्याला इन्कमटॅक्स भरावा लागेल. कलम 24 (B) अंतर्गत घेतलेला कर लाभ परत घेतला जात नाही किंवा रद्द होत नाही.

पात्र अर्जदाराला घर बांधकाम किंवा घर खरेदी या दोघांसाठी मिळते गृहकर्ज :
तुम्ही गृहकर्ज फक्त घर विकत घेण्यासाठी नाही तर नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी देखील घेऊ शकता. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर देखील तुम्ही कर लाभ घेण्यास पात्र असाल. मात्र त्यासाठी तुम्हाला काही अटीची पूर्तता करावी लागेल. नवीन घराचे बांधकाम ५ वर्षांच्या आत पूर्ण झाले पाहिजे. नाहीतर तुम्ही करवाजवटीचा लाभ मिळन्यास पात्र असणार नाही. गृहकर्ज घेऊन नवीन घर विकत घेतल्यास जोपर्यत घराचा ताबा मालकाला मिळत नाही किंवा घराचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यत गृहकर्ज रिपमेंटवर करवजावटीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. गृहकर्जाची परतफेड करताना कर्जधारक इन्कमटॅक्स ॲक्ट 1961 कलम 80C आणि 24 B अंतर्गत करवजावटीचा लाभ घेण्यास पात्र असतो.

जर तुम्ही दोन घराचे मालक असाल तर?
तुम्ही स्वताच्या नावावर दोन घरे विकत घेऊ शकता. जर तुम्ही तिसरे घर तुमच्या नावावर विकत घेतले तर त्याला कायद्यानुसार भाड्यावर घेतलेले मानले जाईल. तिसऱ्या घरावर बाजारभावाने मासिक भाडे मोजले जाईल आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Home loan tax benefits on buying new home on 20 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x