14 December 2024 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Garment Mantra Share Price | शेअरची किंमत 8 रुपये, 2 दिवसात दिला 29% परतावा, वेळीच खरेदी करून फायदा घेणार?

Garment Mantra Share Price

Garment Mantra Share Price | गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प सादर केल्याच्या दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम उत्साह संचारला आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 8.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8.87 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.78 रुपये होती. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीचे शेअर्स 8.92 टक्के वाढीसह 8.79 रुपये किमतींवर क्लोज झाले आहेत.

गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल या कंपनीचे 50.10 टक्के भाग भांडवल कंपनीच्या प्रवर्तकांनी धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 49.90 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, कंपनीला नुकताच एक मोठी ऑर्डर देखील मिळाली आहे.

कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीला 14.19 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील तीन तिमाहीत करायची आहे. या कंपनीच्या व्यावसायिक इतिहासात आंतरराष्ट्रीय निर्यात बाजारातून अशी ऑर्डर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल लिमिटेड कंपनीचे एमडी प्रेम अग्रवाल यांनी एका निवेदनात माहिती दिली की, आम्ही एक संघ म्हणून भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. आता कंपनी वाजवी किंमत सूत्र आणि दर्जेदार उत्पादनांसह पुढे जाण्याच्या योजनेवर लक्ष केंद्रित करत आहे. आज 5 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जाणार आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Garment Mantra Share Price BSE Live 05 February 2024.

हॅशटॅग्स

Garment Mantra Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x