24 March 2023 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ChatGPT Job Effect | चॅट जीपीटी'मुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रचंड धोका, कोणत्या नोकऱ्या सुरक्षित? लिस्ट मध्ये तुमची नोकरी कोणती? Accenture Job Loss | आयटी क्षेत्रात भूकंप, दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेन्चर 19,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार OnePlus Nord CE 3 Lite 5G | वनप्लसचा 108 MP कॅमेरा असलेला स्वस्त Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच होणार, किंमत-फीचर्स? Hindenburg Report on Block Inc | अदानींनंतर हिंडनबर्गचा बॉम्ब या उद्योगपती फुटला, शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले Numerology Horoscope | 24 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या Sera Investment Share Price | लॉटरीच लागली! गुंतवणुकदारांना 454 टक्के परतावा दिल्यानंतर आता हा शेअर स्प्लिट होतोय
x

हे काय? पठाण सिनेमावरील टिपणीनंतर नवनीत राणांचा भगव्या वस्त्रातील तो अश्लील डान्स व्हिडिओ व्हायरल, सोबत भगवादारी साधू

Former Actress Navneet Rana

MP Navneet Rana Bhagwa Dress Dance Video | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे सध्या देशभरात नवा वाद उफाळून आलाय. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपने त्याच्यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी आता होतेय.

याप्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केले होते. खासदार नवनीत राणा यांनी नुकतंच एएनआय या वृत्तसंस्थेकडे यावर प्रतिक्रिया दिली होती. त्या यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या होत्या की’ “मला असं वाटतंय की ज्या रंगाचा गैरवापर चित्रपटात केला गेला असेल आणि त्यामुळे जर आपल्या देशातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर सर्वप्रथम सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहायला हवा. जर कुठेही असं काही आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारे दृश्य असेल तर त्याला एडिट करुन पुन्हा प्रदर्शित करायला हवं.

एखाद्या चित्रपटाला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला बॉयकॉट करण्यापेक्षा आक्षेपार्ह किंवा भावना दुखावणारे दृश्य असतील तर सेन्सॉरने ते पाहायला हवं. त्यानंतर त्यात एडिट करुनच ते प्रदर्शित करायला हवं. कारण शेवटी सिनेसृष्टीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यामुळे देशाला आर्थिकरित्या आधार मिळतो.

मी या गोष्टींचा सकारात्मकरित्याच विचार करतेय. पण मला असे वाटतं की जर कोणत्या गोष्टीमुळे आपल्या भावना दुखावल्या जात असतील तर सेन्सॉर बोर्ड आहे, त्यांना त्यांचे काम करायला हवं. आम्हीही फार सकारात्मक पद्धतीनेच याचा विचार करत आहोत की देशभरातील कलाकारांच्या चित्रपटांना बॉयकॉट करु नये. कारण त्यांचा आपल्या देशातील आर्थिक जडणघडणीत फार मोठा वाटा आहे”, असे त्या म्हणाल्या.

तो व्हिडिओ आणि स्वतःच धामिर्क खात्रीत:
मात्र नवनीत राणा यांच्या या विधानानंतर आता त्यांचे सिनेमातील जुने भगव्या कपड्यातील अश्लील नृत्याचे व्हिडिओ व्हायरल होतं आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत भगव्या वस्त्रात अश्लील डान्स करताना एक साधू देखील भगव्या वस्त्रात दिसत आहेत. त्यामुळे भाजपसाठी नेहमी राजकीय स्टंटबाजी करण्यात प्रसिद्ध असलेल्या खासदार नवनीत राणा या आता स्वतःच धामिर्क खात्रीत अडकण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former Actress Navneet Rana Bhagwa Dress Movie dancing video viral on social media check details on 19 December 2022.

हॅशटॅग्स

#Navmeet Rana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x