4 May 2024 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

PPF Vs ELSS | पीपीएफ आणि ईएलएसएस योजनेतील फायदे आणि फरक माहिती आहेत? गुंतवणुकीवेळी हे लक्षात ठेवा

PPF vs ELSS

PPF vs ELSS | जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा पगार आयकर स्लॅब अंतर्गत येत असेल, तर गुंतवणूक बाजारात उपलब्ध असलेल्या कर बचत योजनेत पैसे लावून तुम्ही कर लाभ घेऊ शकता. अशा अनेक कर बचत योजना आहेत, ज्या तुम्हाला कर सवलत मिळवून देऊ शकतात. जसे की नॅशनल पेन्शन स्कीम, स्मॉल सेव्हिंग स्कीम, टॅक्स सेव्हिंग एफडी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. PPF आणि ELSS मधील गुंतवणूक प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

PPF आणि ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा म्हणजे त्यात फक्त भाघोस परतावाच नाही तर, कर सवलत देखील मिळते. या दोन्ही गुंतवणूक योजना दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावून देतात. या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील दिली जाते. तुम्हाला जर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि ELSS मध्ये गुंतवणुक करण्याबद्दल शंका असेल तर आज या लेखात आम्ही तुमच्या सर्व शंकांचे निरसन करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या दोन्ही योजनांचे फायदे आणि फरक

गुंतवणुकीतील जोखीम :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना भारत सरकार समर्थित असून या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकारद्वारे सुरक्षा हमी देण्यात येते. या योजनेत तुमचे गुंतवलेले पैसे 100 टक्के सुरक्षित राहतील अशी हमी भारत सरकार देते. दुसरीकडे, ELSS स्कीम ही एक इक्विटी-लिंक्ड गुंतवणूक योजना असून ही गुंतवणुक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. या स्कीम मध्ये पैसा बुडण्याचा धोका असतो. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक जोखीम पाहिल्यास PPF मध्ये गुंतवणूक करणे जास्त सुरक्षित आहे.

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील गुंतवणुकीवर मिळणारे व्याजदर भारत सरकार ठरवते. PPF योजनेतील व्याजदराचे भारत सरकारद्वारे प्रत्येक तिमाहीत पुनर्विलोकन केले जाते. सध्या PPF योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. ELSS गुंतवणुकदारांकडून उभारलेले बहुतेक पैसे इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये लावले जातात. त्यामुळे, ELSS स्कीम ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. या गुंतवणूक योजनेत परतावा प्रमाण निश्चित नाही. तथापि, ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास 12-14 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. त्यामुळे ELSS मधील गुंतवणूक ही परताव्याच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकते.

गुंतवणुक रक्कम मर्यादा :
PPF स्कीममध्ये दोन पद्धतीने पैसे जमा करता येते. एकरकमी पद्धतीने किंवा एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. त्याच वेळी वर्षभरात किमान 500 रुपये गुंतवणूक करता येते. ELSS मध्ये गुंतवणूक करण्याची किमान किंवा कमाल कोणतीही मर्यादा नाही.

आयकर लाभ :
जर तुम्ही PPF मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला तीन प्रकारचे लाभ मिळतात. PPF योजनेत गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला आय कायद्यानुसार जेर सवलतीचा लाभ घेता येतो. गुंतवणुकीवर मिळालेल्या व्याज परताव्यावर आणि मुदतपूर्तीच्या रकमेवर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही. दुसरीकडे, ELSS स्कीममध्ये गुंतवणुक केल्यास जेर तुम्हाला 1 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला तर तुम्हाला 10 टक्के दराने LTCG कर भरावा लागेल. मात्र, एका वर्षात केलेल्या 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्यानुसार सवलत मिळू शकते. यावरून असे कळते की PPF योजनेत गुंतवणूक करणे अधिक लाभदायक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Vs ELSS scheme investment benefits and return on investment with risk factors on 04 November 2022.

हॅशटॅग्स

PPF vs ELSS(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x