18 May 2021 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

Valentine Day Special | वाचा श्रेयस तळपदेची भन्नाट लव्ह स्टोरी

Valentine Day special, Shreyas Talpade, Dipti Talpade, Love story

मुंबई, १४ फेब्रुवारी: बॉलीवूड आणि मराठी चित्रपटामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते अनेक आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे श्रेयश तळपदे. मराठी सिनेसृष्टीसोबतच श्रेयस बॉलीवूडमध्ये देखील खुप प्रसिद्ध आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘इकबाल’ चित्रपटामूळे त्याला खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहीले नाही. हिंदीमध्ये गोलमाल, दौड, ओम शांती ओम, वेलकम टु सज्जनपुर अशा चित्रपटांमध्ये काम केले. तर मराठीमध्ये पछाडलेला, सावरखेड एक गाव, आई शपथ्थ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मराठमोळ्या श्रेयसने बॉलीवूडमध्ये देखील वेगळी ओळख निर्माण केली. श्रेयस त्याच्या या यशाचे सगळे श्रेय त्याच्या पत्नीला देतो. त्याची पत्नी नेहमी त्यासोबत खंभीरपणे उभी होती. म्हणून तो करिअरमध्ये एवढा पुढे जाऊ शकला. श्रेयस आणि दिप्तीची लव्ह स्टोरी देखील तेवढीच रंजक आहे. दोघांची भेट एका कार्यक्रमामध्ये झाली होती. दिप्तीला पाहताच क्षणी श्रेयस तिच्या प्रेमात पडला होता. त्याने वेळ न घालवता दिप्तीला लग्नासाठी प्रपोज केले. जाणून घेऊया दिप्ती आणि श्रेयसची लव्ह स्टोरी.

श्रेयसने टेलिव्हिजनवरुन त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. त्यामूळे त्याला सगळीकडे ओळखले जात होते. या कालावधीमध्ये श्रेयसला त्याच्या एका मित्राने कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये प्रमूख पाहूणा म्हणून बोलवले. त्याने या कार्यक्रमाला होकार दिला. या कार्यक्रमामध्ये दिप्ती सेक्रटरी होती. दिप्तीला पाहताच क्षणी श्रेयस तिच्या प्रेमात पडला होता. त्याने वेळ न घालवता दिप्तीला लग्नासाठी प्रपोज केले. तिने देखील होकार दिला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दिप्ती आणि श्रेयस रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी श्रेयसने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यामूळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीमध्ये दिप्ती नेहमीच त्याच्यासोबत होती. अनेक वेळा दिप्तीने श्रेयला गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पैसे दिले होते. कोणतीही अडचण आली तरी दिप्ती श्रेयससोबत असायची. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम आहे. २००४ साली दिप्ती आणि श्रेयस लग्नबंधनात अडकले. २००८ मध्ये दोघांना मुलगी झाली. एवढ्या वर्षांनंतरही दोघे सुखाने संसार करत आहेत. श्रेयस सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे.

 

News English Summary: Maharashtrian Shreyas Talpade also made a name for himself in Bollywood. Shreyas gives all the credit for his success to his wife. His wife always stood firm with him. So he was able to go so far in his career. The love story of Shreyas and Dipti is equally interesting. The two met at an event. Shreyas had fallen in love with Dipti the moment he saw her. Without wasting time, he proposed marriage to Dipti. Let’s know the love story of Dipti and Shreyas.

News English Title: Valentine Day special Shreyas Talpade and Dipti Talpade Love story news updates.

हॅशटॅग्स

#ValentinesDay(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x